माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी केली नुकसानग्रस्त शेतीची पहाणी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०६ ऑक्टोबर २०२१

माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी केली नुकसानग्रस्त शेतीची पहाणी

माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी केली नुकसानग्रस्त शेतीची पहाणी


गादमाशी व खोडकिड्यांच्या प्रादुर्भावामुळे धानपिकाचे प्रचंड नुकसान


नुकसान भरपाई मिळेपर्यंत भाजपा स्वस्थ बसणार नाही- हेमंत पटलेसंजीव बडोले प्रतिनिधी.


नवेगावबांध  ता.५.

यावर्षी पाणीपाऊस व्यवस्थीत असला तरी गादमाशी व खोडकिड्यांच्या प्रादुर्भावामुळे धानपिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे यावर्षी खरीप हंगामातील धानाचे पिक हे तीस टक्केवर येवुन ठेपले आहे. दोन वर्षापासुन सुरू असलेला कोरोणा काळ व सतत लाॅकडाऊन मुळे जनजीवन विस्कळीत झाले असले तरी या परिसरातील मुख्य पिक म्हणजे धान पिक मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली.सर्व सुव्यवस्थित असताना यावेळी धान पिकावर गादमाशी या रोगाचा प्रंचड प्रादुर्भाव असल्याने धान पिके नष्ट झाली आहेत.त्यामुळे शेतकरी यांच्या व्यथा व नुकसानग्रस्त शेतीची पहाणी करण्यासाठी माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी नवेगांवबांध , परसोडी परिसरातील विविध गावातील शेतात जावुन पहाणी केली. 

  यावर्षीच्या निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतक-यांची दयनीय अवस्था झाली आहे. ती शेतक-यांच्या बांधावर जावुन प्रत्यक्ष पाहणीनुसार गादमाशी, तुडतुडा ,चित्रलोंबी, कडीकरपा, या विविध रोगानी धानाचे पिक बहुतांशी प्रमाणात नेस्तनाबूत झाले आहेत.त्यामुळे शेतकरी नैराश्येतुन हवालदिल झाला आहे  त्यामुळे एकरी २५ हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची शेतकरीवर्गाने मागणी केली आहे. यावर माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी भारतीय जनता पार्टी सदैव शेतकरी यांचे पाठीसी असुन नुकसानग्रस्त शेतकरी यांना नुकसान भरपाई मिळवुन देण्यासाठी प्रयत्न करु असे आश्वासन दिले. 


नुकसान भरपाई मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही- हेमंत पटले

आज आम्ही संपूर्ण जिल्ह्य़ात फिरून नुकसानग्रस्त शेतातील पाहणी करत आहोत .विविध किडी व रोगांमुळे जिल्ह्य़ातील शेतकरी फार चिंतातुर झालाय, अशा परिस्थितीत शासनाकडून मदत न मिळाल्यास शेतकऱ्यांना आत्महत्येशिवाय पर्याय नाही .अशा बिकट परिस्थितीत जिल्हा भाजपा शेतकऱ्यांच्या पाठीशी असून नुकसान भरपाई मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही असे मत भाजप जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांनी परसोडी येथे बोलतांना व्यक्त केले.

------

 नुकसानग्रस्त शेतीची पहाणी करण्यासाठी माजी मंत्री राजकुमार बडोले, माजी आमदार हेमंत पटले,माजी आमदार रमेश कुथे,माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रचना गहाणे,शेषराव गिर्हेपुंजे, जिल्हा महामंत्री लायकराम भेंडारकर, किसान आघाडी जिल्हा अध्यक्ष संजय टेंभरे,रघुनाथ लांजेवार, विजयाताई कापगते, खुशाल काशिवार, होमराज पुस्तोळे, अन्ना डोंगरवार, गौरेश ब्राम्हणकर, भोजु लोगडे, नुतनलाल सोनवाने, व्यंकट खोब्रागडे, अनिरुद्ध शहारे, अण्णा डोंगरवार तामदेव कापगते व अन्य भाजपा कार्यकर्ते व मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.