माहिती आयुक्त राहुल पांडे यांचा मनसेने केला गौरव - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०६ ऑक्टोबर २०२१

माहिती आयुक्त राहुल पांडे यांचा मनसेने केला गौरवMaharashtra राज्य माहिती आयोगाच्या माहिती आयुक्तपदी नुकतीच नेमणूक झालेले नागपुरातील वरिष्ठ अभ्यासू पत्रकार व राजकीय विश्लेषक श्री राहुल पांडे ( Rahul pande)यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) वतीने गौरव करण्यात आला.

 श्री. राहुल पांडे यांच्या नागपुरातील काँग्रेस नगर स्थित निवासस्थानी मनसेचे राज्य सरचिटणीस हेमंत गडकरी व शहर अध्यक्ष अजय ढोके यांच्या हस्ते शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. राहुल हे अभ्यासू व मेहनती असल्याने मिळालेल्या महत्वपूर्ण पदाची शान नक्कीच वाढवतील, अनेक वर्षांनंतर परिचित व्यक्ती या पदावर गेल्याचा आपणांस आनंद झाला असे हेमंत गडकरी यांनी सांगितले.

 हेमंत गडकरी व अजय ढोके यांनी राहुल यांना त्यांच्या उज्वल कार्यकाळासाठी व या कार्यालयात असलेल्या असंख्य तक्रारीचे निवारण करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

 आपण आपल्या कार्यकाळात 20 ओव्हरच्या मॅच प्रमाणे जलदगतीने निर्णय घेऊन कार्यरत राहू अश्या भावना राहुल पांडे यांनी यावेळी व्यक्त करून घरी येऊन आवर्जुन सत्कार केल्याबद्दल मनसे पदाधिकाऱ्यांना धन्यवाद दिले. यावेळी कामगार सेनेचे गणेश मुदलियार व काँग्रेस नगर येथील मनसेचे पदाधिकारी हर्षद दसरे प्रामुख्याने उपस्थित होते. 


 Rahul pande MNS Nagpur Maharashtra