रसोई द किचन येथे गृहिणींसाठी आयोजित प्रदर्शनीचे महापौरांच्या हस्ते उदघाटन | - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


१९ ऑक्टोबर २०२१

रसोई द किचन येथे गृहिणींसाठी आयोजित प्रदर्शनीचे महापौरांच्या हस्ते उदघाटन |

चंद्रपूर : मंगळवार दि. १९ ऑक्टोबरला पहचान समूहाचे उपहारगृह रसोई द किचन (rasoi The Kitchen) येथे गृहिणींसाठी प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनीचे उदघाटन महापौर राखी कंचर्लावार यांनी केले. 

या प्रदर्शनीमध्ये विशेषतः गृहिणी तसेच दिव्यांग महिलांद्वारे कपडे, खाद्यपदार्थ, दागिने, अगरबत्ती आणि इतर वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूंचे स्टॉल्स  लावण्यात आले होते. यावेळी क्षमा महाकाले, निमिषा महाकाले प्रमुख पाहुणे तसेच पहचान संस्थेच्या संस्थापिका शितल पडगेलवार, मंजुषा हरकारे, अमीत पडगेलवार आणि संस्थेचे सर्व सदस्य उपस्थित होते. 

कोरोना महामारीमुळे सर्व व्यवसाय डबघाईस आले. तसेच घरगुती व्यवसायाला देखील प्रतिसाद नव्हताच. हि अडचण लक्षात घेऊन शितल पडगेलवार यांनी 'पहचान - माय आयडेंटिटी' या संस्थेची स्थापना आपली सहकारी मंजुषा हलकारे यांच्या सोबतीने केली. महिलांना कार्यकुशल बनविणे तसेच त्यांचा व्यक्तिमत्व विकास साधणे यासाठी विविध विषयांवर प्रशिक्षण या संस्थतर्फे दिले जाते. सदर प्रशिक्षण केवळ चंद्रपूरच नव्हे तर मुंबई, पुणे, गुजरात येथील प्रशिक्षकांमार्फत देखील दिले जाते. या संस्थेमार्फत दिव्यांग महिलांसाठी देखील उपक्रम चालविले जातात.

Mayor inaugurates exhibition for housewives