जल है तो कल है- ग्रामायण सृजनगाथा मध्ये मा. अविनाश शिर्के | - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

शनिवार, ऑक्टोबर २३, २०२१

जल है तो कल है- ग्रामायण सृजनगाथा मध्ये मा. अविनाश शिर्के |

जल है तो कल है- ग्रामायण सृजनगाथा मध्ये मा. अविनाश शिर्के

नागपूर, २२ऑक्टोबर

सृजनगाथा भाग -९ मध्ये मार्गदर्शक म्हणून लाभले होते मा.श्री अविनाश शिर्के, प्राचार्य- 
सावित्री जोतीराव सामाजिक कार्य महाविद्यालय, यवतमाळ. मा. अविनाशजी एक अभ्यासू, सामाजिक आणि संवेदनशील असे व्यक्तिमत्त्व. शिक्षण, आवड आणि कार्यक्षेत्र यांना एकत्र करुन त्याचा उपयोग सामाजिक विकासासाठी मा. अविनाशजी यांनी केला व तो सगळ्यांनाच कसा करता येईल या बद्दल देखील मार्गदर्शन त्यांनी आपल्या मुलाखती दरम्यान केले.


आपल्या कार्यविषयी बोलतांना त्यांनी सुरुवात केली ती पार्श्वभूमीने ज्यात कामाची सुरुवात त्या मागचा उद्देश व दूरदर्शी सामाजिक विचारांचा प्रत्यय आपल्याला येतो. विज्ञान शाखेतील शिक्षण, पाणलोट क्षेत्राविषयी जिज्ञासा व त्याची निकड, अण्णा हजारेंचा आदर्श, मुबलक व योग्य वेळी मिळालेल्या उत्तम संधी आणि आवडीच्या कामातच कार्य त्यातून मिळणार अलौकिक समाधान हि त्यांच्या यशस्वी कार्याची गुरुकिल्ली अस ते म्हणतात.


त्यांची कार्यभूमी पश्चिम विदर्भ जी कोरडवाहू आणि शेतकरी आत्महत्येसाठी कुप्रसिद्ध आहे. अशा ठिकाणी सगळ सुरळीत होण्यासाठी लागणारी एकमेव गोष्ट म्हणजे आणि त्याचे योग्य नियोजन या विचारावर त्यांनी पाणलोट क्षेत्रात कार्यास प्रारंभ केला. सुरुवात केली ती निरीक्षण, विचार विनिमय आणि भेटींनी ज्यात सर्व स्तरांवरील लोकांचा सहभाग होता. यातून पाण्याची मुख्य अडचण ही शेतकरी आणि महिला वर्ग यांना भासते हे निष्पन्न झाला. यावर अभ्यास करताना त्यांनी अनेक प्रकल्प भेटी, तज्ञांचे मार्गदर्शन घेतले आणि स्थानिक संपन्नता आणण्यासाठी मृदा व जल संधारणाचे शिवधनुष्य पेलले. 

जल मृदा नियोजन पाणलोट प्रकल्पाद्वारे करतांना त्यात मुख्यत्वे स्थानाचे क्षेत्रफळ, भूभाग प्रकार आणि पावसाच प्रमाण याचा विचार केला. ज्यामुळे गाळ जमा होणे, पाणवसन, पिकांच नुकसान, मृदा ह्रासकारक आणि अल्पजीवी प्रकल्पांची संख्या कमी होऊन अल्पखर्चिक, उत्पादक व टिकाऊ प्रकल्प उदयास आले. यात गरज व क्षेत्रानुसार त्यांच्या प्रकल्पाच्या रचना बनविण्यात येतात असे ते म्हणाले. यात विविध पद्धती आणि तंत्रज्ञानाचा ते उपयोग करतात. 


मा.श्री अविनाश प्रशिक्षक, मूल्यमापक, संशोधक म्हणून किफायतशीर वॉटर शेड विकास क्षेत्रात सक्रियपणे काम करतात. PRAMAN स्केल द्वारे माती आणि पाणी यांची धूप या समस्येवर शेतकऱ्यांना सतर्क बनवण्यासाठी मूल्यांकनाचे कार्यही ते सातत्याने करतात. 

प्रगती बंधू समूहाच्या समन्वयाने माती आणि जलसंवर्धनामध्ये सहभागी तंत्र विकसित  तसेच रिचर्ड पिट आणि स्मार्ट बंड्सचा सराव मॉडेल त्यांनी तयार केला आहे.महाराष्ट्राच्या पश्चिम विदर्भातील फील्ड मॉडेलच्या लोकप्रियतेसाठी देखील ते कार्यरत आहेत.


स्थानिक स्वयंसेवी संस्थांसह संयुक्त वन व्यवस्थापन, MREGS, ग्रामीण उपजीविका आणि सेंद्रिय शेती या विषयांमध्ये सक्रिय सहभाग असतो.

मा. श्री अविनाशजी शिर्के यांच्या या आगळ्यावेगळ्या आणि सर्जनशील प्रवासाचा आदर्श युवा पिढीसमोर ग्रामायण सृजनगाथाद्वारे आला आहे. मा. श्री. अविनाश शिर्के यांची मुलाखत प्रा. डॉ. विजय घुगे यांनी तसेच परिचय आणि आभारप्रदर्शन श्री. रेवसकर यांनी केले.


Jal hai to kal hai- in rural creation story Avinash Shirke