पोलिसांच्या आशीर्वादाने चंद्रपूर शहरात अवैध दारू विक्री? दारूबंदी उठविल्यानंतर सुद्धा तस्कर सक्रिय - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत

०८ ऑगस्ट २०२१

पोलिसांच्या आशीर्वादाने चंद्रपूर शहरात अवैध दारू विक्री? दारूबंदी उठविल्यानंतर सुद्धा तस्कर सक्रिय

 चंद्रपूर : जिल्ह्यात तत्कालीन भाजप सरकारने दारूबंदी केली होती. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीची सरकार येताच चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्यात आली. असे असले तरी जिल्ह्यासह चंद्रपूर शहरात अवैध दारुतस्कर अजूनही सक्रिय असून, गल्लीबोळात अवैध दारूविक्री सुरूच आहे.    (Illegal sale of liquor in Chandrapur city)शहरातील बंगाली कॅम्प चौक, इंदिरा नगर, कृष्णनगर, शाम नगर परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्ती सुरू असून, दररोज चौका चौकात गर्दी असते. त्यामुळे सामान्य नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या अवैध दारूविक्री बाबत पोलीस गाढ झोपेत आहेत.  पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Illegal sale of liquor in Chandrapur city with the blessings of police? The smugglers remained active even after the ban was lifted