नक्षलवाद्यांनी पुरून ठेलेली स्फोटके हस्तगत - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०६ ऑक्टोबर २०२१

नक्षलवाद्यांनी पुरून ठेलेली स्फोटके हस्तगतगोंदिया पोलिसांची कामगिरी


केशोरी पोलीस स्टेशन अंतर्गत नक्षलवाद्यांनी पुरून ठेलेली स्फोटके हस्तगत
संजीव बडोले/प्रतिनिधी
नवेगावबांध दि.6 ऑक्टोबर:-
गोंदिया जिल्हा पोलीस विभागाच्यावतीने नक्षलग्रस्त असलेल्या जिल्ह्याच्या अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील पोलीस स्टेशन केशोरी अंतर्गत येत असलेल्या भरनोली आऊट पोस्टमधील आंबेझरी ते नागलडोह मार्गावरील जंगलात नक्षल्यांनी पुरून ठेवलेल्या स्फोटक साहित्याचा शोध लावून, साठा हस्तगत केला आहे.गडचिरोली आणि गोंदियाचे पोलीस उपमहानिरिक्षक संदिप पाटील यांच्या मार्गदर्शनात ही मोहीम जिल्हा पोलिसांनी आज (दि.6 ) राबवली.


मिळालेली माहितीनुसार आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास सी 60 जवानांचे पथक आणि पोलिसांची एक चमू सर्चिंग मोहीमेवर असताना त्यांना नागनडोह मार्गावरील जंगलालगतच्या मार्गावर स्फोटके लपवून ठेवल्याचा संशय आल्याने, शोध मोहीम सुरु केली असता, अंदाजे 67 डेटोनेटर,23 जलिटीन रॉड,वायरसह अन्य विस्फोटक साहित्य घटनास्थळावरुन हस्तगत केले आहे.पोलिसांच्या या कामगिरीबद्दल पोलीस अधिक्षक विश्व पानसरे,अप्पर पोलीस अधिक्षक अशोक बनकर व उपविभागीय पोलीस अधिकारी जालंदर नालकुल यांनी पोलिसांचे अभिनंदन केले आहे.