गेवरा बुज. येथे कर्करोग निदान शिबिर - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०३ ऑक्टोबर २०२१

गेवरा बुज. येथे कर्करोग निदान शिबिर
निफन्द्रा : येथून जवळच असलेल्या गेवरा बुज. येथे टाटा ट्रस्ट कॅन्सर केअर पोग्राम चंद्रपूर तथा सोबत फॉउंडेशन संलग्नित जाणीव रुग्णालय गेवरा बुज. च्या माध्यमातून कर्करोग निदान शिबिराचे आयोजन 5 ऑक्टोबर 2021ला सकाळी 9 ते दुपारी 2 पर्यंत जाणीव रुग्णालय गेवरा बुज. येथे केले आहे.

या शिबिरात तोंडात चार बोटापेक्षा कमी बोटे जाणे, तोंडात लाल आणि पांढरे फोड येणे,महिलांच्या स्तनात गाठी येणे, महिलांना पांढरा पाण्याचा त्रास असणे आदी प्रकारचे लक्षणे असणाऱ्या व्यक्तींनी या शिबिराचा पुरेपूर लाभ घ्यावा, या शिबिरात कर्करोग निघणाऱ्या रुग्णांना मोफत उपचारासाठी दाखल करण्यात येईल, तरी सावली, ब्रम्हपुरी व सिंदेवाही तालुक्यातील जनतेनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे