आरोग्यवर्धिनी केंद्र सुदृढ आरोग्य केंद्र - डॉ. स्वेता कुलकर्णी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०३ ऑक्टोबर २०२१

आरोग्यवर्धिनी केंद्र सुदृढ आरोग्य केंद्र - डॉ. स्वेता कुलकर्णी

आरोग्यवर्धिनी केंद्र सुदृढ आरोग्य केंद्र - डॉ. स्वेता कुलकर्णी


चांन्ना आरोग्य वर्धिनी केंद्रात गांधी जयंती साजरी
संजीव बडोले प्रतिनिधी .

नवेगावबांध ता.3.
सत्य, अहिंसा यावर असिम निष्ठा ठेऊन, भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे सेनानी महात्मा गांधी यांची १५२ वी जयंती आरोग्यवर्धिनी केंद्र चांन्ना बाकटी येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. गांधी जयंती निमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वेता कुलकर्णी डोंगरवार, आरोग्य सेविका उईके, राखडे आशा गटप्रवर्तक, नंदेश्वर, शेंडे,वाहक उरकुडे उपस्थित होते. प्रारंभी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलित करून त्यांना अभिवादन करण्यात आले. आरोग्यवर्धिनी केंद्राच्या परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. केंद्राचे सुशोभिकरण करण्यात आले. वर्धिनी केंद्र हे सुदृढ आरोग्याचे केंद्र आहे. त्यामुळे केंद्रात यापुढेही स्वच्छतेला विशेष प्राधान्य देण्यात येईल. तर पुढीलआठवड्यामध्ये कुटुंब नियोजनाचे शस्त्रक्रिया शिबिर देखील घेण्यात येणार असल्याची माहिती, वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वेता कुळकर्णी डोंगरवार यांनी दिली.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिचर बाळू, घटारे, सुमित्रा, बंडू शेंडे, तांडले यांनी सहकार्य केले.