चंद्रपूरचे माजी उपनगराध्यक्ष प्रमोदजी मुल्लेवार यांचे निधन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०८ ऑक्टोबर २०२१

चंद्रपूरचे माजी उपनगराध्यक्ष प्रमोदजी मुल्लेवार यांचे निधन


चंद्रपूरचे माजी उपनगराध्यक्ष प्रमोदजी मुल्लेवार यांचे निधनराजकारण, समाज सेवा आणि स्वयंनिर्मित उद्योग यात भरीव कार्य केलेले समाज बांधव श्री प्रमोदजी मुल्लेवार वय८० बालाजी वार्ड चंद्रपूर यांचे आज ता. ८.१०.२१ रोजी सकाळी ५ वाजता दु: खद निधन झाले. मागील बरेच दिवसापासून ते किडनी विकाराने आजारी होते.
ते युवा अवस्थेतच भाजप कार्यकर्ते झाले आणि चंद्रपूर नगरपालिकेचे उपाध्यक्ष पदावर कार्य केले. समाज कार्यातही त्यांचा सिंहाचा वाटा होता. चंद्रपूर जिल्हा विश्व ब्राह्मण सेवा समितीचे पदाधिकारी म्हणूनही त्यांनी अनेक वर्षे काम केले. त्यांचा पांचाल युवा समिती कडेही विशेष ओढा होता. विश्वकर्मा पांचाल संस्कृती मंडळाला त्यांचे भरीव योगदान लाभले होते. चंद्रपूरात शिल्ड ट्रॉफी बनविण्याचा व्यवसाय त्यांनीच प्रथम सुरू केला. रोड सिग्नल बनविण्याचा कारखाना ही त्यानीच सुरू केला. समाजाने उद्योगशील व्हावे असे ते नेहमी सांगत.


त्यांच्या पश्चात पत्नी, ३ मुली, मुलगा, सून ,जावईं, नातवंडे, बंधू असा मोठा परिवार आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

Former Deputy Mayor of Chandrapur Pramodji Mullewar passes away