‘हेरीटेज वृक्षांना’ संरक्षित वृक्ष असल्याचे फलक लावण्याची इको-प्रो ची मागणी - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

शनिवार, ऑक्टोबर ३०, २०२१

‘हेरीटेज वृक्षांना’ संरक्षित वृक्ष असल्याचे फलक लावण्याची इको-प्रो ची मागणी

‘आडेयुक्त व खिळेमुक्त वृक्ष अभियान’ राबविण्याची मागणी

महानगरपालिका आयुक्त यांना इको-प्रो पर्यावरण विभाग तर्फे निवेदनचंद्रपूर : शहरातील ‘हेरीटेज वृक्षांना’ 'संरक्षित वृक्ष' असे फलक लावण्याची तसेच ‘आडेयुक्त व खिळेमुक्त वृक्ष अभियान’ राबविण्याची मागणी इको-प्रो पर्यावरण विभाग तर्फे विभाग प्रमुख नितिन रामटेके यांनी महानगरपालिका आयुक्त राजेश मोहिते यांचेकड़े निवेदनातून केली आहे. 

यावेळी इको-प्रो चे अब्दुल जावेद, अमोल उत्तलवार सहभागी होते. ऑक्टो महिन्याच्या इको-प्रो संस्थेच्या मासिक सभेत झालेल्या चर्चेनुसार इको-प्रो पर्यावरण विभाग ने शहरातील वृक्ष संवर्धन तसेच जनजागृती साठी कार्यक्रम राबविन्याचे ठरले होते. 


हेरिटेज वृक्ष

राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाने 50 वर्ष वयाच्या वृक्षांना ‘हेरीटेज ट्रि’ चा दर्जा दिलेला असुन त्याचे संरक्षणाचे निर्देश सर्व स्थानिक स्वराज्य संस्थाना दिले आहे. चंद्रपुर महानगरपालीकेने सुध्दा वृक्ष गणना केली असुन यातील 'हेरीटेज वृक्षांना' संरक्षण देण्याकरीता प्रत्येक हेरीटेज वृक्ष लगत एक फलक ‘हेरीटेज ट्रि - संरक्षीत वृक्ष’ चंद्रपूर शहर महानगरपालीका असे लिहुन या वृक्षांस कोणतीही इजा पोहचविणे किंवा तोडल्यास कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल असे फलक लावण्याची मोहीम सुरू करावी तसेच स्थानीक पातळीवर सर्व सामान्य नागरीकाना याची माहिती होणे आवश्यक आहे.


15 ऑग 2021 पासुन इको-प्रो ने ‘माझी वंसुधरा अभियान’ अंतर्गत इको-प्रो ‘खिळेमुक्त वृक्ष’ व ‘आडेयुक्त वृक्ष - देऊ वृक्षांना मोकळा श्वास’ अभियानाची सुध्दा सुरूवात महानगरपालिका आयुक्त राजेश मोहिते यांच्या उपस्थितीत केली असुन महानगरपालीका वृक्ष संवर्धन व वृक्ष प्राधीकरण विभागाच्या मार्फत व्यापकपणे ही मोहीम राबविण्याची मागणी केली आहे.


आडेयुक्त वृक्ष

शहरात मोठया प्रमाणात विकासकामे केली जात आहेत, यात सिंमेट क्रॉकीट रस्त्याचे बांधकामाचे प्रचलन वाढले आहे. यामुळे रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडे या क्रॉकीटीकरणामुळे झाडांना काटोकाट कांक्रीट टाकल्याने वृक्षांचा श्वास कोंडला जातोय. कुठलेही रोड बांधकाम करतांना वृक्षांना आडे ठेवणे किंवा वृक्ष लावण्यास जागा ठेवुन आडे करण्याची गरज आहे. ज्या वृक्षांचा श्वास कोंडला जात आहे ती जागा मोकळी करून त्या सभोवताल आडे करण्यात यावे अशी मागणी निवेदन मधुन करण्यात आली आहे.


खिळेमुक्त वृक्ष

शहरातील अनेक वृक्षांवर विवीध जाहीरातीचे फलक खिळे ठोकुन लावण्यात आलेले आहे. त्यामुळे वृक्षाना इजा पोहचत आहे. अशा सर्व झाडांवरील खिळे काढुन टाकुन वृक्ष खिळेमुक्त करण्यात यावे. यापुढे ज्यांच्या जाहीराती दिसेल त्यांचेवर कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आलेली आहे.


#ecopro @banduplan