डॉ. संजय कुमार सिंह यांना गोंडवाना विद्यापीठाचा उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०६ ऑक्टोबर २०२१

डॉ. संजय कुमार सिंह यांना गोंडवाना विद्यापीठाचा उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार

गडचांदूर- येथील शरदराव पवार कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय कुमार सिंह यांना गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचा उत्कृष्ट प्राचार्य म्हणून पुरस्कार प्राप्त झाला आहे.

   गोंडवाना विद्यापीठात २ ऑक्टोंबर २०२१ रोजी झालेल्या १०  व्या वर्धापन दिन व दशमानोत्सव सोहळ्यात  राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री नामदार उदय सामंत यांचे हस्ते डॉ. संजय कुमार सिंह यांना सपत्नीक हा पुरस्कार  प्रदान करण्यात आला.

   यावेळी  आमदार डॉ.देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे,गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. श्रीनिवास वरखेडी, प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे व कुलसचिव डॉ. अनिल  चिताडे तथा  गोंडवाना विद्यापीठाचे माजी कुलगुरू  डॉ. विजय आईंचवार  आणि डॉ. किर्तीवर्धन दीक्षित , डॉ. नामदेव कल्याणकर, प्रभुती  यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

      डॉ.संजय कुमार सिंह यांची प्राचार्य म्हणून ११ वर्षे प्रशासकीय सेवा झाली असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली  महाविद्यालयाला अनेक  पुरस्कार प्राप्त झाले  आहेत.        त्यांच्या मार्गदर्शनात महाविद्यालयात निरंतर सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रम गेल्या अनेक वर्षापासून राबवले जात आहे.तसेच महाविद्यालयात त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज पावेतो अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदेचे यशस्वी आयोजन करण्यात आलेले आहे. डॉ. संजय कुमार सिंग हे आचार्य पदवी चे मार्गदर्शक  असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांना आचार्य पदवी प्राप्त झाली आहे. त्यांची अनेक संदर्भ ग्रंथ,पुस्तके प्रकाशित आहेत.             

       डॉ.संजयकुमार सिंह त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाला NAAC  चा  'बी'  दर्जा प्राप्त असून राष्ट्रीय सेवा योजना, निरंतर प्रौढ शिक्षण व विस्तार  तथा सांस्कृतिक उपक्रमामध्ये महाविद्यालयाची  यशस्वी वाटचाल सुरू आहे. डॉ. संजयकुमार सिंह यांनी आपल्या कुशल नेतृत्वातून  महाविद्यालयात अनेक सुविधा आणि सोय उपलब्ध  करून दिल्या असून गडचांदूर व कोरपणा या ग्रामीण आदिवासी भागातील हे महाविद्यालय शिक्षण विकासाचे केंद्र बनले आहे. सदर पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल डॉ.संजयकुमार सिंग यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे.