जुन्नर मधील ४ शिक्षकांना जिल्हा पुरस्कार | - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


१३ ऑक्टोबर २०२१

जुन्नर मधील ४ शिक्षकांना जिल्हा पुरस्कार |


 
जुन्नर मधील ४ शिक्षकांना जिल्हा पुरस्कार 

जुन्नर /आनंद कांबळे 

 जुन्नर शहरातील अतुल औटी प्राचार्य सबनीस प्राथमिक विद्यालय ,शत्रुघ्न लबडे  मुख्याध्यापक काँर्नेल मेमोरियल स्कूल ,रेश्मा शेख  मुख्याध्यापिका अजुंमन प्रायमरी , व राजेंद्र ढोबळे मुख्याध्यापक प्राथमिक विद्यालय बारव या शिक्षकांसह सन   

२०२०-२१व २०२१-२२या दोन वर्षातील सुमारे ५८ शिक्षकांना महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक  समिती शाखा  पुणे जिल्हा यांच्या वतीने  शिक्षक आमदार प्रा.जयंत आसगावकर  यांचे उपस्थितीत , शिक्षक संघटनेचे  राज्य अध्यक्ष भरत रसाळे  यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

          संघटनेचे महासचिव अंजन पाटील ( धुळे )परीक्षा परिषदेेचे उपायुक्त मा. हारूण अत्तार  पुणे जि.प. चे प्रशासकीय अधिकारी केंद्रे यांचे  पुणे जिल्ह्यातील आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा मोठया उत्साहात संपन्न झाला.

       

आयुक्त  विशाल सोळंकी व सहसंचालक महेश पालकर , उपसंचालक उकिर्डे ,शिक्षणाधिकारी मा. स्मिता गौड यांनी पुरस्कारप्राप्त शिक्षकांना शुभेच्छा पत्राद्वारे व दूरध्वनीद्वारे शुभेच्छा देऊन गौरव केला.      


कार्यक्रमाचे  नियोजन राज्य उपाध्यक्ष सारंग पाटील, पुणे जिल्हाध्यक्ष तथा राज्य कार्याध्यक्ष संतोष शिळमकर . राज्य शिक्षकेतर प्रमुख गुरुबा मोराळे, राज्य सहसचिव धीरज गायकवाड, महिला अध्यक्षा सौ.मोरे मॅडम, गुजराती विद्यालय व शैक्षणिक संकुलाच्या मुख्याध्यापिका मा. पटेल मॅडम उपाध्यक्ष शिवाजीराव माने ,सचिव श्रीकांत रहाने सर, राठोड सर तसेच इतर  कार्यकर्त्यांनी   केले.