चान्ना येथे विद्यार्थिनींना सायकल चे वाटप - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


१० ऑक्टोबर २०२१

चान्ना येथे विद्यार्थिनींना सायकल चे वाटप

 चान्ना येथे विद्यार्थिनींना सायकल चे वाटप
संजीव बडोले प्रतिनिधी


नवेगावबांध ता.१० 

जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा चांन्ना बाकटी येथे दिनांक 8 ऑक्टोंबर रोजी अनुसूचित जातीच्या इयत्ता सातवी व आठवी मध्ये शिकणाऱ्या ७ विद्यार्थिनींना सायकलचे वाटप करण्यात आले.

 राज्य शासनाकडून जिल्हा परिषद गोंदिया अंतर्गत समाज कल्याण विभागाच्या वतीने मागासवर्गीय मुलींच्या शिक्षणासाठी मुलींना शाळेत येणे-जाणे करण्यासाठी सायकलचे वाटप करण्यात येते. त्याअंतर्गत शाळेत शिकणाऱ्या इयत्ता सातवी व आठवीच्या सात  विद्यार्थिनींना सायकल मंजूर झालेले आहेत. याप्रसंगी ग्रामपंचायतचे सरपंच देवकाबाई मरस्कोल्हे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नरेश राखडे,शाळेचे मुख्याध्यापक डी.टी.

 सलामे, विद्यार्थिनींचे पालक व शाळेतील शिक्षक वृंद उपस्थित होते.