Top News

सुप्रसिद्ध लोककलावंत दादा पारधी यांचे दुखःद निधन : झाडीपट्टीत शोककळा dada paradhi zadpatti natyakalavant

चंद्रपूर (प्रतिनिधी) - झाडीपट्टीतील सुप्रसिद्ध लोककलावंत , ज्येष्ठ समाजसेवी दादा अंताराम पारधी यांचे काल रात्री ११ वाजता वृद्धापकाळाने...

ads

शुक्रवार, ऑक्टोबर ०८, २०२१

पोंभूर्णा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा - सामाजिक कार्यकर्ता अशोक सिडाम यांची मागणी

पोंभूर्णा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा - सामाजिक कार्यकर्ता अशोक सिडाम यांची मागणी
पोंभूर्णा प्रतिनिधी,
यंदा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.त्यामुळे अनेक नदी नाल्याना पूर आलेला असून पावसाचे पाणी जागोजागी साचून राहिल्याने अनेकांना दुबार पेरणी संकट ओढवले आहे. मात्र येवढे करून सुध्दा पावसाच्या सततच्या सरिने पीक चीबाळून पूर्णतः खराब झाले आहेत. यात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेले असून लागत खर्चही निघणार नसल्याने कर्जाच्या परत फेडीची व कुटुंबाच्या उदर् निर्वाहाची मोठी चिंता निर्माण झाली आहे. याची दखल घेत शासनाने तात्काळ दखल घेत त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी जोर धरत आहे.

   पोंभूर्णा तालुका हा आदिवासी बहुल तालुका आहे. या तालुक्यातील नागरिकांची उपजीविका केवळ शेती आणि शेतमजुरी यावर अवलंबून आहे. या भागात पाण्याची फारशी साधने नसली तरी काही परिसरात नदी नाले आहेत तर काही भाग हा खोलगट आहे त्यामुळे पावसाने सतत हजेरी लावली तर नदी नाल्यांना पूर येते व खोलगट भागामध्ये पावसाचे पाणी साचून राहते त्यामुळे भात पिकासह अति पावसाच्या पाण्याने तूर सोयाबीन, व कापूस हे पीक खराब होते. यात शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून तेलही गेले नी तूपही गेले आणि हातात धुपाटणे आले. अशी गत शेतकऱ्यांची झाली आहे. सावकाराकडून तर कोणी शेतावर कर्ज घेऊन शेतात उत्पन्न घेऊन परिवाराच्या वर्षभराच्या पोटाची भूक भागेल या भावनेतून स्वतःसह माझ्या देशाच्या नागरिकांना अन्न मिळावे म्हणून मोठ्या उमेदीने शेतकरी संकटाची तमा न बाळगता शेती करत आहे. मात्र निसर्गाला हे पाहवत नसून शेतकरी यंदा ओला दुष्कालात बुडाला आहे.  शेतात तिळमात्रही उत्पन्न निघत नसल्याने अखेरीस शेतकरी नावाचाराजा पुरता कर्जात बुडात आहे. याची दखल घेत शासनाने आदिवासी बहुल पोंभुर्णा तालुक्याला सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांना एकरी ५०००० ( पन्नास हजार रुपये ) नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते अशोक सिडाम यांनी केली आहे. मागणी मान्य न झाल्यास शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.