गोंदिया जिल्ह्यात covid-19 लसीकरणाचे कवचकुंडल अभियान आरंभ - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


१० ऑक्टोबर २०२१

गोंदिया जिल्ह्यात covid-19 लसीकरणाचे कवचकुंडल अभियान आरंभ

 गोंदिया जिल्ह्यात covid-19 लसीकरणाचे कवचकुंडल अभियान आरंभ
संजीव बडोले प्रतिनिधी.


नवेगावबांध दि.10 ऑक्टोबर:-

8 ऑक्टोंबर रोज गुरुवारपासून राज्यात आरोग्य विभागाच्या वतीने covid-19 लसीकरणाचे कवच कुंडल हे अभियान राबविण्यास सुरुवात झाली आहे. अभियानांतर्गत अठरा वर्षाच्या वरील सर्व नागरिकांचे लसीकरण करून घेण्याच्या कार्याला सुरुवात झाली आहे. सर्व नागरिकांचे पहिला डोस या अभियानांतर्गत पूर्ण होईल यावर जोर दिला जात आहे. या अनुषंगाने गोंदिया जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी जिल्ह्यात हे अभियान यशस्वीरित्या राबविण्यात यावे. असे दिनांक 7 ऑक्टोबरला जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी, सरपंच, पोलिस पाटील, स्वस्त धान्य दुकान, महिला बचत गट, शेतकरी बचत गट, राजकीय पदाधिकारी, सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी, महाविद्यालयीन विद्यार्थी या सर्वांना या मोहिमेत सहभागी करून घेण्याचे आदेशात म्हटले आहे. कवचकुंडल अभियानाअंतर्गत उपविभागीय अधिकाऱ्यांनी तालुका स्तरावरील नियोजन बैठकीचे आयोजन करून तहसीलदार गटविकास अधिकारी तालुका आरोग्य अधिकारी नगरपरिषद पंचायत चे मुख्याधिकारी एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी कृषी अधिकारी इत्यादींनी या अभियानाला सहकार्य करावे. तालुकास्तरावर तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी 18 वर्षावरील कोविड लसीकरण न झालेल्या व दुसरा डोस करिता शिल्लक असलेल्या लाभार्थ्यांची गाव निहाय यादी आरोग्य सेविका व सामुदायिक आरोग्य अधिकाऱ्यांकडून तयार करून घेण्याची सूचना केली आहे. या मोहिमेत शिक्षण विभागाची देखील सहकार्य घेण्यात येणार आहे. लसीकरण केंद्रावर कोविन ऍपवर लाभार्थ्यांची माहिती अद्यावत करण्याकरता शिक्षकांना प्रशिक्षण द्यावे व मोहीमे करिता लसीकरण केंद्रावर शिक्षकांची नेमणूक करण्यात यावी. असेही आदेशात पुढे म्हटले आहे. 1 ऑक्टोंबर ते 14 ऑक्टोंबर दरम्यान covid-19 लसीकरणाच्या मिशन कवच-कुंडल या अभियानांतर्गत सर्व नागरिकांचे लसीकरण व्हावे. हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे.