Top News

डिजिटल मीडियाचा श्रमिक पत्रकार वर्गवारीत समावेश | digital media

*‘ व्हॉईस ऑफ मीडिया’च्या लढ्याला मोठे यश* *ईलेक्ट्रॉनिक्स, डिजिटल, रेडिओ आस्थापनांचा श्रमिक पत्रकार वर्गवारीत समावेश* *मुंब...

ads

शनिवार, ऑक्टोबर १६, २०२१

मंगळवारी छगन भुजबळ चंद्रपुरात | chhagan-bhujbal

मंगळवारी छगन भुजबळ चंद्रपुरात 


ओबीसींचे राष्ट्रीय नेते, राष्ट्रवादी काॅंग्रेसचे जेष्ठ नेते व महाराष्ट्राचे मंत्री मा. ना. श्री. छगनराव भुजबळ (chhagan-bhujbal) हे कोरोना प्रादुर्भावामुळे प्रदिर्घ कालावधीनंतर पुर्व विदर्भाच्या दौर्‍यावर येत आहेत. रविवारी १७ आक्टोंबरला सायंकाळी ७:३० वाजता नागपुर विमानतळावर त्यांचे आगमन होत आहे. त्यावेळी स्वागतासाठी राष्ट्रवादी काॅंग्रेस, ओबीसी सेल व महात्मा फुले समता परीषदेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहुन स्वागत करावे, असे आवाहन राष्ट्रवादी ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्र्वर बाळबुधे यांनी केले आहे.


मा.ना. श्री भुजबळ हे रविवारी नागपुरला येवून सोमवारी सकाळी ९ वा गडचिरोलीला रवाना होणार आहेत.गडचिरोलीला दुपारी १ वाजता राष्ट्रवादी काॅंग्रेस व महात्मा फुले समता परीषदेच्या वतीने, या आदिवासी बहुल जिल्ह्यातील आरक्षण पुर्वत १७% केल्याबाबत मा. भुजबळ साहेबांचा सत्कार व अभिनंदन सोहळा करण्यात येणार आहे. असाच कार्यक्रम मुल जि. चंद्रपुर येथे सायंकाळी ५ वाजता आयोजित केला असुन रात्री चंद्रपुर येथे मुक्काम आहे.

 

मंगळवारी दुपारी १२ वाजता चंद्रपुर येथे सुध्दा राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी व महात्मा फुले समता परीषदे आणि ओबीसी च्या विविध संघटनाच्या वतीने मा. भुजबळ साहेबांचा सत्कार व अभिनंदन सोहळा जनता महाविद्यालय,चंद्रपुर येथे आयोजित करण्यात आलेला आहे.त्यानंतर नागपुरला त्याच दिवशी मंगळवारी सायंकाळी ५ वाजता महात्मा फुले समता परीषद व राष्ट्रवादी काॅंग्रेस ओबीसी सेल पदाधिकार्‍यांची बैठक रविभवन नागपुर येथे  आयोजित करण्यात आलेली आहे.त्या बैठकीला मा. ना. श्री. छगन भुजबळ (chhagan-bhujbal हे संबोधित करणार आहेत.


    तरी सदर मा. ना. भुजबळ साहेबांच्या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी , ओबीसी सेल, व महात्मा फुले समता परीषदे तसेच ओबीसी, बहुजन कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन ओबीसी सेल प्रदेशाध्यक्ष ईश्र्वर बाळबुधे यांनी केले आहे.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.