चंद्रपूर - मूल मार्गावरील कृष्णनगर जवळ चारचाकी वाहनाचा अपघात | - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

रविवार, ऑक्टोबर ३१, २०२१

चंद्रपूर - मूल मार्गावरील कृष्णनगर जवळ चारचाकी वाहनाचा अपघात |

चंद्रपूर - मूल मार्गावरील कृष्णनगर जवळ चारचाकी वाहनाचा अपघात चंद्रपूर : चंद्रपूर-मूल मार्गावरील कृष्णनगर जवळ चारचाकी वाहनाचा आज शनिवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास अपघात झाला असून लांजेवार परिवार थोडक्यात बचावला आहे.

चंद्रपुरातील उर्जानगर वसाहतीत राहणारे हेमंत लांजेवार हे परिवारासह चंद्रपुर मूल मार्गावरील लोहारा जवळ जेवण करण्यासाठी जात होते. मात्र कृष्णनगर जवळ त्यांच्या चारचाकी वाहनाने डीवायडर ला धडक दिली. या वाहनात एकूण चार लोक होते.यात मात्र सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे.

चंद्रपूर मूल मार्गावरील रोडचे काम सुरू आहे. अशातच या मार्गावर स्ट्रीट लाईट नसल्याने छोटे मोठे अपघात होत आहेत. त्यामुळं प्रशासनाने या मार्गावर स्ट्रीट लाईट लावावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.


Chandrapur - Four-wheeler accident near Krishnanagar on the main road