चंद्रपुरातील वाढत्या गुन्हेगारीवर आज मुंबईत बैठक - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत२६ ऑक्टोबर २०२१

चंद्रपुरातील वाढत्या गुन्हेगारीवर आज मुंबईत बैठक

चंद्रपुरातील वाढत्या गुन्हेगारीवर आज मुंबईत बैठक 

चंद्रपूर - जिल्ह्यातील दारू सुरु झाल्यापासून गुन्हेगारीत मोठी वाढ झाली आहे. खून, मारामाऱ्या, धमक्याचे प्रकार वाढले आहेत. चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील अवैध धंद्यांसंदर्भातील गुन्हे, जिल्ह्यातील दारूबंदी हटविल्यानंतर वाढलेले गुन्हे याकडे लक्ष वेधण्यासाठी आज २६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.०० वा.  राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या सोबत विधिमंडळ लोकलेखा समिती प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांची बैठक होणार आहे.  मंत्रालय, मुबंई येथील बैठकीत चंद्रपूर जिल्ह्यातील वाढत्या गुन्ह्यांबाबत उपाययोजना करण्यावर चर्चा होईल. 


२२ ऑक्टोबर रोजी  राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नागपूर (Nagpur) येथे पोलिस मुख्यालयात नागपूर व गडचिरोली (Gadchiroli) परिक्षेत्राच्या पोलीस दलाच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी जिल्हानिहाय गुन्हे आणि कायदा व सुव्यवस्थेचा आढावाही घेतला. चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील अवैध धंद्यांसंदर्भातील गुन्हे याकडे लक्ष वेधण्याचे त्यांनी पोलीस अधीक्षकांना सांगितले होते. आता आठवडाभरातच दुसरी बैठक होत आहे. 

 जिल्ह्यात दारूबंदी उठविल्यानंतर खून, बलात्कारांच्या घटनांत वाढ झाली का? याचा अभ्यास करण्यासाठी एका समितीचे गठन करावे, अशी मागणी माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार (MLA Sudhir Mungantiwar) यांनी केली. एकतर्फी प्रेमातून चाकू हल्यात एका अल्पयवीन मुलीचा चंद्रपुरात मृत्यू झाला. चाकू हल्ला करताना आरोपीने यथेच्छ मद्यपान केले होते. मागील दोन महिन्यांत जिल्ह्यात खून, चोरी, भांडण-तंट्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या गुन्हेगारी घटनांना दारू सुरू झाल्याची पार्श्वभूमी आहे, असा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. आता खुद्द आमदार मुनगंटीवार यांनीही वाढत्या गुन्हेगारीमागच्या कारणांचा शोध घेण्यासाठी समिती स्थापन करण्याची मागणी केली होती.


 #Chandrapur #Crime #police #meeting