मनपाच्या 'युवा स्वास्थ्य कोविड-१९ लसीकरण' उपक्रमाअंतर्गत खत्री महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी घेतली कोविड लस - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

गुरुवार, ऑक्टोबर २८, २०२१

मनपाच्या 'युवा स्वास्थ्य कोविड-१९ लसीकरण' उपक्रमाअंतर्गत खत्री महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी घेतली कोविड लसमनपाच्या 'युवा स्वास्थ्य कोविड-१९ लसीकरण' उपक्रमाअंतर्गत खत्री महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी घेतली कोविड लस

चंद्रपूर, ता.२८ : चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे शहरात लसीकरणाचा टक्का वाढविण्यासाठी महापौर राखी कंचर्लावार यांच्या संकल्पनेतून अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहेत. १८ वर्षांवरील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी 'युवा स्वास्थ्य कोविड-१९ लसीकरण' मोहिमेअंतर्गत दिनांक २८ ऑक्टोबरला दुर्गापूर रोड तुकूम येथील डॉ. खत्री महाविद्यालय येथे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आले.

मनपातर्फे मंगळवार दिनांक २६ ऑक्टोबरपासून सोमय्या पॉलिटेक्निक महाविद्यालयात १८ वर्षांवरील विद्यार्थ्यांसाठी 'युवा स्वास्थ्य कोविड-१९ लसीकरण' मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर दररोज शहरातील विविध महाविद्यालयांमध्ये लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. महाविद्यालयातील लसीकरणास पात्र विद्यार्थी उत्स्फूर्तपणे लसीकरण करून घेत आहेत.

तुकूम येथील डॉ. खत्री महाविद्यालय येथे आयोजित शिबिरात प्राचार्य डॉ. जे. एम. काकडे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. रवींद्र मुरमाडे, सह अधिकारी प्रा. आशिष चहारे, अधीक्षक प्रमोद राऊत, नॅक समनवयक डॉ. पी. एम. तेलखडे, आयक्वेक समन्वयक डॉ. एन. आर. दहेगावकर, डॉ. ज्योत्स्ना मोहितकर तसेच महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. नयना उत्तरवार, डॉ. अतुल चटकी, डॉ. देवयानी भुते आदींची उपस्थिती होती.