नवरात्र,दसरा,धम्मचक्र प्रवर्तन उत्सव शांततेत पार पाडा - ठाणेदार जनार्धन हेगडकर - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०७ ऑक्टोबर २०२१

नवरात्र,दसरा,धम्मचक्र प्रवर्तन उत्सव शांततेत पार पाडा - ठाणेदार जनार्धन हेगडकर

नवरात्र,दसरा,धम्मचक्र प्रवर्तन उत्सव शांततेत पार पाडा -  ठाणेदार जनार्धन हेगडकर


नवेगावबांध पोलीस स्टेशन येथे आगामी उत्सवा संबंधाने बैठक संपन्न






संजीव बडोले प्रतिनिधी.


नवेगावबांध दि.7  ऑक्टोबर:-

आगामी उत्सव दुर्गा,शारदा व धम्मचक्र प्रवर्तन दिननिमीत्ताने आज दिनांक 6 ऑक्टोबर  रोज बुधवारला संध्याकाळी 4.00 पोलीस स्टेशन नवेगावबांध येथे बैठक आयोजित करण्यात आली होती.  बैठकीला पोलीस पाटील,सर्व  मंडळाचे अध्यक्ष/उपाध्यक्ष ,पोलीस मित्र बहुसंख्येने उपस्थित होते.

राज्यात कोविड-१९ कोरोना विषाणू प्रादुर्भाव असल्याने दरवर्षी प्रमाणे यावर्षीसुद्धा दुर्गा,शारदा मातेच्या मुर्तीची स्थापना दसरा धम्मचक्र प्रवर्तन दिन  उत्सव साजरा करण्यात येणार असल्याने नवेगावबांध पोलीस स्टेशनचे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्दन हेगडकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.सदर बैठकीत उपस्थित पोलीस पाटील, पोलीस मित्र, दुर्गा शारदा मंडळ, संघटना यांच्या पदाधिकाऱ्यांना राज्यात कोविड -१९ या संसर्गजन्य विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता, नवरात्र उत्सव,दसरा, धम्मचक्र प्रवर्तन दिन दरम्यान सदर रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये. म्हणून आगामी नवरात्र उत्सव संबंधाने शासनाचे दि. ४आक्टोंबर २०२१ रोजीचे परिपत्रकानुसार यावर्षी नवरात्र उत्सव साजरा करीत असताना सामाजिक दुरावा राखून शासनाने दिलेल्या दिशानिर्देशाचे काटेकोरपणे पालन करून अत्यंत साधेपणाने साजरा करावा.  जास्त गर्दी न करता दुर्गा, शारदा मातेची मूर्ती जास्त मोठी न ठेवता , नागरिकांना अवाजवी वर्गणी न मागता, विनाकारण डि.जे.,मोठे पंडाल न उभारता, मिरवणूका न काढता, उत्सवादरम्यान मोठ्या प्रमाणात सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करु नये, जेणेकरून सामान्य जनतेला आर्थिक अडचण निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्याबाबत तसेच दुर्गा, शारदा मातेच्या मुर्तींचे विसर्जन नदी, तलावात न करता  कृत्रिम तलाव तयार करून त्यात विसर्जन करावे, याबाबत सुचना दिल्यात.दुर्गा, शारदा मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी यांनी आपल्या मंडळातर्फे स्वयं प्रेरणेने गरजु लोकांची मदत करावी व सामाजिक जनजागृती करावी याबाबत मार्गदर्शन करून सदर उत्सव शांततेत पार पाडण्याचे आवाहन ठाणेदार हेगडकर यांनी केले.सदर बैठकीला पोलीस स्टेशनच्या  हद्दीतील 27 गावातील पोलीस पाटील, पोलीस मित्र ,24 दुर्गा, शारदा मंडळ,संघटनेचे पदाधिकारी, शांतता समितीचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते. बैठक कोरोना प्रोटोकॉल पाळण्यात आला.