अभिनेता शाहरुखचा मुलगा आर्यन खान बाबतीत, ओवैसींचे मोठे विधान - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


१८ ऑक्टोबर २०२१

अभिनेता शाहरुखचा मुलगा आर्यन खान बाबतीत, ओवैसींचे मोठे विधान


बॉलिवूड- अभिनेता शाहरुखचा मुलगा आर्यन खान खानचा अंमली पदार्थ प्रकरणी तुरुंगात आहे . यावर एआयएमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी म्हणाले ' एका अभिनेत्याच्या मुलासाठी बोला , असा आग्रह आपल्याला करण्यात येत आहे . पण जे गरीब आहेत , त्यांच्याबद्दल मी बोलेन . उत्तर प्रदेशातील तुरुंगांमध्ये २७ टक्के मुस्लीम आहेत , त्यांच्याबद्दल कोण बोलेल ? , जे गरीब आहे त्यांच्याबद्दल बोलेल , ज्याचे वडील श्रीमंत आहेत , त्याच्याबद्दल बोलणार नाही . ' ओवैसी यांनी गाझियाबादमध्ये एक सभा घेतली . त्यावेळी ते बोलत होते . लखीमपूर हिंसाचारावरूनही त्यांनी सरकारवर निशाणा साधला . आशिष मिश्रा हा एक शक्तिशाली उच्च जातीचा आहे . यामुळे केंद्रीय गृह राज्यमंत्री असलेल्या त्याच्या वडिलांची पंतप्रधान मोदी हे मंत्रिमंडळातून हकालपट्टी करू शकत नाहीत . आशिषचे नाव आतीक असते , तर त्याला आतापर्यंत घरात मारले गेले असते किंवा त्याच्या घरावर बुलडोझर चालवले गेले असते . पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी आशिषच्या अब्बांना का वाचवत आहेत ?, असा सवाल असदुद्दीन ओवैसी यांनी केला .