संतश्रेष्ठ नगाजी महाराज पुण्यतिथी महोत्सव उत्साहात साजरा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत२३ ऑक्टोबर २०२१

संतश्रेष्ठ नगाजी महाराज पुण्यतिथी महोत्सव उत्साहात साजरा


शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी)

         :- येथील मंजुषा ले-आऊट परीसरातील नगाजी महाराज नगरात संतश्रेष्ठ नगाजी महाराज यांचा पुण्यतिथी महोत्सव विविध धार्मिक व अध्यात्मिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित घटस्थापना, पूजा आणि अभिषेक नाभिक समाजातील ज्येष्ठ कार्यकर्ते वामनराव चौधरी यांच्या हस्ते करण्यात आला. 
             यावेळी मंडळाचे पदाधिकारी सुरेश जमदाडे ,सचिन नक्षीने,रमेश खातखेडे, मुरलीधर मेश्राम प्रामुख्याने उपस्थित होते. लक्ष्मणराव चौधरी यांनी पोथीचे पारायण केले. 
             याप्रसंगी ह.भ.प. प्रमिलाताई पिंपरकर यांचे कीर्तनाचा लाभ भाविकांनी घेतला. यावेळी शोभायात्रा काढण्यात आली. ही शोभायात्रा नगाजी महाराजांच्या प्रतिमेसह भजन पूजन करीत नगाजी महाराज मंदिर परिसरात फिरविण्यात आली. या शोभायात्रेत महिला मंडळाच्या वर्षा वाटेकर, माया चिंचोलकर, छाया जमदाडे, योगिता सैदाणे, मंजू मेश्राम, नंदिनी लांडगे, शोभा लांडगे,सविता लांडगे, दामिनी लांडगे, सुरेखा अतकरे, वैशाली दळवी, अनिता निंबाळकर, भुवनेश्वरी निंबाळकर, स्मिता नागपूरकर, मोना जांभूळकर,सुधा हनुमंते, प्रगती चौधरी, प्रतिभा नक्षिणे, कविता नागपुरे प्रामुख्याने उपस्थित होत्या. कोवीड नियमांचे पालन करीत संपन्न झालेल्या या पुण्यतिथी महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी नगाजी महाराज पुण्यतिथी महोत्सव समितीचे अध्यक्ष बंडू व्हि. लांडगे,सचिव सचिन नक्षीने, सहसचिव सुरेश जमदाडे, विजय मेश्राम, हनुमान नक्षीणे, राजू येसेकर, नंदू नक्षिणे यांनी परिश्रम घेतले.