बँकेला आज व्यापारी व शेतकरी ठोकणार टाळे - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२० ऑक्टोबर २०२१

बँकेला आज व्यापारी व शेतकरी ठोकणार टाळे

स्टार पोलीस टाइम्स ब्युरो

पैठण तालुक्यातील विहामांडवा येथील गेल्या अनेक दिवसापासून सेंट्रल बँकेच्या कामकाजाला कंटाळलेले  परिसरातील नागरिक व व्यापारी यांनी आज बुधवार रोजी बँकेच्या शाखेला टाळे लावण्याचा आंदोलन करणार येणार असल्याचा इशारा नायब तहसीलदार दत्तात्रय निलावाड व पोलीस विभागाला निवेदनाद्वारे  दिले आहे.
   
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की विहामांडवा परिसरातील वीस ते पंचवीस खेड्यातील शेतकरी, ज्येष्ठ नागरिक, अपंग, निराधार नागरिकांच्या सोयीसाठी या ठिकाणी सेंट्रल बँकेची शाखा आहे परंतु या शाखेचे कामकाज इंटरनेट सेवा सुरळीत नसल्याच्या नावाखाली अनेक दिवसापासून  बँकेच्या खातेदारांना दररोज समस्येला तोंड द्यावे लागत असल्यामुळे बँकेचे शाखेत कर्जपुरवठा सह तात्काळ कुठलंच काम होत नसल्याने. बँकेचे कामकाज सुधारणा करावा यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना अनेक वेळेस निवेदन देऊन देखील कुठलाच परिणाम न झाल्यामुळे. आज बुधवार दि २० रोजी सकाळी येथील व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र पन्हाळकर, अशोक टाक, महेंद्रकुमार सकलेचा, सय्यद पटेल, हरिपंडित नवथर, शिरसाट, पवार, शेजुळ, सुनील डुकरे, मुन्ना टेलर, इम्रान शहा, शेख जावेद, शेख मोहसीन, भागवत डुकरे यांच्या नेतृत्वाखाली सेंट्रल बँकेच्या शाखेला टाळे लावण्याचे आंदोलन करण्यात येणार आहे सदरील विहामांडवा पोलीस चौकीचे उपनिरीक्षक  शितोळे सुधाकर मोहिते यांनी देण्यात आले आहे.