आकाश अवतारे अर्जुनीमोरगाव चे नवे उपविभागीय अधिकारी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


०९ ऑक्टोबर २०२१

आकाश अवतारे अर्जुनीमोरगाव चे नवे उपविभागीय अधिकारी

आकाश अवतारे अर्जुनीमोरगाव चे नवे उपविभागीय अधिकारीसंजीव बडोले प्रतिनिधी.

नवेगावबांध दि.९ ऑक्टोबर:-
अर्जुनी मोरगाव चे नवे उपविभागीय अधिकारी म्हणून आकाश अवतारे हे चार ऑक्टोंबर रोजी रुजू झाले आहेत. उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले यांच्या स्थानांतरामुळे हे पद रिक्त झाले होते. अर्जुनी मोरगाव चे तहसीलदार विनोद मेश्राम हे या पदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळत होते. 30 सप्टेंबरला नागपूर विभागाचे विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे- वर्मा यांनी गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव येथील उपविभागीय अधिकारी पद रिक्त असल्याने, या पदावरील प्रशासकीय कामे सुरळीत रित्या पार पाडण्याच्या दृष्टीने ,आकाश अवतारे यांचेकडे अर्जुनी मोरगाव च्या उपविभागीय अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्याचे आदेश दिले होते. परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी आकाश आवतारे यांच्याकडे वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्याचे उपविभागीय अधिकारी पदाचाही स्वतंत्र कार्यभार आहे.