'केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांना कारखाली चिरडले ' - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत०४ ऑक्टोबर २०२१

'केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांना कारखाली चिरडले '


 उत्तर प्रदेश- पोलिसांनी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा आणि इतरांवर गुन्हा दाखल केला आहे . लखीमपूर येथील रविवारी झालेल्या हिंसाचाराप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे . आशिष मिश्राने आपल्या कारने आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना कारखाली चिरडले , असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे . तर माझा मुलगा तिथे हजर नव्हता , असा दावा केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांनी केला आहे .