अत्यावश्यक सेवा सोडून इतर सर्व गोष्टी बंद , शिवसेना पूर्ण ताकदीने उतरणार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


०९ ऑक्टोबर २०२१

अत्यावश्यक सेवा सोडून इतर सर्व गोष्टी बंद , शिवसेना पूर्ण ताकदीने उतरणार

उत्तर प्रदेशातील - लखीमपूर हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीने सोमवारी ( 11 ऑक्टोबर ) महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे . काँग्रेस , शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी यासंदर्भात आवाहन केले आहे . या बंददरम्यान सोमवारी अत्यावश्यक सेवा सोडून इतर सर्व गोष्टी दिवसभर बंद राहणार आहेत . या बंदमध्ये शिवसेना पूर्ण ताकदीने उतरणार , असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत स्पष्ट केले .