दोन ट्रकचा समोरा समोर अपघात ; एक ठार एक गंभीर - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

गुरुवार, ऑक्टोबर २८, २०२१

दोन ट्रकचा समोरा समोर अपघात ; एक ठार एक गंभीर

 

विहामांडवा/ प्रतिनिधी

पैठण पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या पाचोड पैठण रोड वरील कॅनल जवळ बुधवारी रोजी दोन ट्रकचा समोरा समोर विचित्र अपघात होऊन यामध्ये चालक जागीच ठार तर एक गंभीर जखमी झाला आहे. मयत झालेल्या चालकाचे नाव मोहनलाल मिश्रीम फूलवारी रा गांधीधाम भारतनगर गुजरात असे आहे.
 पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की पैठण - पाचोड  रोड वरील कॅनल जवळ बुधवारी  रोजी ४ ३० वाजता अहमदनगर कडून पाचोडला जाणाऱ्या आयशर क्रमांक एम एच सीसी ९९२१व पाचोड मार्गे पैठण कडे येणाऱ्या केंटर ट्रक क्र. जे जी १२ बी वाय ०१७८ या दोन्ही वाहनाचा समोरा समोर विचित्र अपघात झाला व यामध्ये वाहन चालक ट्रक मध्ये अडकल्यामुळे जागेवरच ठार झाल्याची माहिती माहिती  पोलीस निरीक्षक किशोर पवार, पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण सागडे यांनी मिळाल्यामुळे तात्काळ पोलीस पथक घटनास्थळी जाऊन ट्रक मध्ये अडकलेल्या चालक मोहनलाल मिश्रीम फूलवारी वय ३२ रा. गांधीधाम भारतनगर गुजरात याला प्रथम जेसीबी मशिनच्या मदतीने बाहेर काढले व या अपघातात गंभीर जखमी झालेल्या राजेंद्र रावसाहेब सुळे वय २३ रा. खेड ता. कर्जत जि. अहमदनगर या जखमेला पैठण येथील शासकीय रुग्णालयात उपचार साठी दाखल करण्यात आले असून या विचित्र अपघातामुळे घटनास्थळ काही काळ वाहतूक बंद झाली होती अपघात प्रकरणी पैठण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण सागडे हे करीत आहे.