युवकाची गळफास घेऊन आत्महत्या; डॉ. आंबेडकर वार्डातील घटना - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०८ ऑक्टोबर २०२१

युवकाची गळफास घेऊन आत्महत्या; डॉ. आंबेडकर वार्डातील घटना

*परिसरात उलट-सुलट चर्चेला उधाण


शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी)
:- येथील डॉक्टर आंबेडकर वार्डातील एका युवकाने आपले स्वतःचे घरी छताला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दि. ८ ऑक्टोबरला पहाटे उघडकीस आली.
अक्षय सुबोध रामटेके ( २४ ) राहणार आंबेडकर वार्ड भद्रावती असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. नातेवाईकांनी केलेल्या तक्रारीवरून घटनास्थळाचा पंचनामा करून पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे. या आत्महत्येबाबत परिसरात उलट-सुलट चर्चेला उधाण आले असून नेमकी आत्महत्या का केली याबाबत अद्यापही खुलासा झाला नाही.