विमानाला "वॉटर सॅल्यूट" का व कधी दिला जातो - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत२५ ऑक्टोबर २०२१

विमानाला "वॉटर सॅल्यूट" का व कधी दिला जातो

 विमानाला "वॉटर सॅल्यूट" का व कधी दिला जातो. 


ज्यावेळी विमानाला फायरब्रिगेडच्या गाडीतुन दोन बाजुनी पाण्याचा फवारा देऊन स्वागत केले जाते त्याला "वाॅटर सॅल्यूट " म्हणतात.म्हणजेच एकप्रकारे विमानाला सलामी दिली जाते. दोन्ही बाजुनी पाण्याच्या फवारातुन विमान येत असते त्यावेळी तयार होणारे इंद्रधनुष्य पाहण्यासारखे असते. 

विमानाला "वॉटर सॅल्यूट" का व  कधी दिला जातो
अनेकांना असं वाटत की, विमान थंड करण्यासाठी असं केलं जातं. पण तो एक गैरसमज आहे मुळात विमान हे ११ हजार फूट उंचीवर उडतात. इतक्या उंचीवर वातावरण फार थंड असतं. त्यामुळे विमान थंड करण्यासाठी पाणी सोडलं जातं, यात काहीच तथ्य नाही. वॉटर सल्यूट करण्याचा उद्देश हा सन्मान करण्याचा असतो.

काय आहे कारण

पुर्वी प्रवासासाठी विमानाअगोदर जहाजाचा  वापर केला जात होता. . त्यावेळी अशी प्रथा होती की, जेव्हाही एखादं नवीन जहाज समुद्रात उतरत असेल तर त्याच्यावर पाण्याचा वर्षाव करून स्वागत केलं जायचं.ही प्रथा इंग्रजानी स्विकारली होती. तीच प्रथा पुढे विमानांसाठीही केली जाऊ लागली.विमानाला दोनदा वॉटर सल्यूट दिला जातो. एक म्हणजे जेव्हा एखादं विमान एखाद्या विमानतळावरून पहिल्यांदाच उड्डाण घेत असेल त्यावेळी  असं केलं जातं.तसेच एखादे विमान आपला शेवटचा प्रवास करून कायमचे रिटायर होत असेल त्यावेळी, तर दुसरं कारण म्हणजे जर विमानाच्या कॅप्टनच्या रिटायरमेंट वेळी विमानावर पाण्याचा वर्षाव केला जातो. म्हणजेच वॉटर सल्यूट दिला जातो.

हा "वॉटर सॅल्यूट" केवळ भारतातच नव्हे तर अमेरिका, चीन,इंग्लंड व अन्य देशात देखील दिला जातो.