धक्कादायक! दरोडेखोरांचा शेतवस्तीवर हल्ला;दोन महिलांवर सामुहिक बलात्कार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२० ऑक्टोबर २०२१

धक्कादायक! दरोडेखोरांचा शेतवस्तीवर हल्ला;दोन महिलांवर सामुहिक बलात्कार


औरंगाबाद- जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील तोंडाळी गावातील शेतवस्तीवर बुधवारी मध्यरात्रीतून दरोडेखोरांनी धुमाकूळ घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे . दरोडेखोरांनी या वस्तीची नुसती लूटच केली नाही तर दोन महिलांवर बलात्कार केल्याचीही माहिती समोर आली आहे .

या घटनेमुळे औरंगाबादमधील पैठण तालुक्यासह संपूर्ण औरंगाबाद जिल्ह्यामध्ये चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.  तोंडाळी गावातील शेतवस्तीवर घडलेल्या या भयंकर प्रकारामुळे अवघ्या गावात दहशत पसरली आहे . दरम्यान घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पुढील तपास केला जात आहे . सूत्रांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार , दरोडेखोरांनी येथील वस्तीची लूट केली . तसेच येथील दोन महिलांवर सामुहिक बलात्कारदेखील केला आहे . याप्रकरणी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरु आहे . दरम्यान या दोन्ही महिलांना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे . भाजपच्या सभापती अणुराधा चव्हाण यांनी या घटनेचा तिव्र निषेध केला आहे.