Top News

नव्या वर्षातील जानेवारी महिना निघाला संपूर्ण प्रदूषित The month of January in the new year turned out to be completely polluted

नवं वर्षातील जानेवारीचा चंद्रपुरचा प्रदूषण निर्देशांक 31पैकी 31 दिवस प्रदूषन आढळले हिव्वाळा सुरू झाल्या पासून चंद्रपुर च्या प्रदूषनात वाढ झा...

ads

गुरुवार, ऑक्टोबर ०७, २०२१

वनविभाग व इको-प्रो तर्फे वन्यजीव सप्ताहच्या वतीने मोटारसायकल रॅली


शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी)
 :- भद्रावती वनविभाग क्षेत्र भद्रावतीच्या मार्फत व इको-प्रो माध्यमातून वन्यजीव सप्ताहाचे आयोजन 1 ऑक्टोंबर ते 7 ऑक्टोंबर पर्यंत आयोजित केले होते.
         आज दिनांक 7 ऑक्टोंबरला सकाळी 8 वाजता नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून वनविभाग भद्रावती व इको- प्रो भद्रावती च्या वतीने मोटारसायकल रॅली चे उद्घाटन करण्यात आले होते.
             यावेळी ही मोटारसायकल रॅली भद्रावती वनविभाग कार्यालय मधून तांडा, मासळ, मांगली, आष्टी चोरा, चिचोली मार्गे भद्रावती मध्ये रॅलीच्या माध्यमातून वन्यजीवांची संरक्षण व जंगल बचाव करण्याबाबत तालुक्यातील व ग्रामीण भागात जाऊन जनजागृती करून गावकऱ्यांना संदेश देण्यात आला.
यानंतर भद्रावती वनविभाग कार्यालय येथे वन्यजीव सप्ताहचा समारोप कार्यक्रम घेण्यात आला होता. 
             या कार्यक्रमात वनपरिक्षेत्र अधिकारी पी. एच. शेंडे, क्षेत्र सहाय्यक एन व्ही हनवते,  डब्ल्यू एल तोडकर, जि पी उगे, वनरक्षक  मोंढे,  शेडमाके, वरखेडे,  देवगळे, गेडाम, शेळकी, रोहिले, फुलझलें, कुबळे, शेख, सहारे, शेंद्रे, भवरे.  व इको-प्रो भद्रावती संस्थेचे अध्यक्ष संदीप जिवणे, किशोर खंडाळकर, अमोल दौलतकर,  शिरीष उगे, शुभम मेश्राम ओमदास चांदेकर,  पवन मांढरे, शंकर घोटेकर, तसेच सार्ड वन्यप्रेमीचे अनुप येरने, दीपक बाकरे उपस्थित होते. व भद्रावती वनविभाग तर्फे सर्वांचे आभार मानले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.