विमान कोसळलं ; अनेकांचा मृत्यू - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


१० ऑक्टोबर २०२१

विमान कोसळलं ; अनेकांचा मृत्यू


 रशियाचे एल 410 टर्बोलेट एअरक्राफ्ट क्रॅश होऊन 19 जणांचा मृत्यू झाला . टाटारस्तान इथं सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली . विमानामध्ये 20 हून अधिक प्रवाशी होते अशी माहिती समोर येत आहेत . काही जण जखमी झाले आहेत . जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे . विमानात पॅराशूट जंपर्सचा एक ग्रुप जात होता . तातारस्तानवरुन उड्डाण घेताना या विमानाचा अपघात झाला .