' अंगावर प्रचंड कर्ज आहे , आता बंद ठेवणार नाही ' - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


११ ऑक्टोबर २०२१

' अंगावर प्रचंड कर्ज आहे , आता बंद ठेवणार नाही '


सत्ताधारी- पक्षांनी बंद पुकारल्याची घटना कदाचित महाराष्ट्रात पहिल्यांदाच होत आहे . मात्र , या बंदला राज्यातील व्यापाऱ्यांनी व दुकानात काम करणाऱ्यांनी विरोध दर्शवला आहे . आम्ही लखीमपूरच्या घटनेचा निषेध करतो . काळ्या पट्ट्या लावून काम करणार आहे . कोरोनानंतर बऱ्याच वेळाने दुकाने सुरु झाली आहेत . प्रचंड कर्ज अंगावर आहे . दुकानात काम करणाऱ्यांचे पगार देणेही अवघड झाले आहे , असे व्यापाऱ्यांनी सरकारला म्हटले आहे .