प्रकल्पग्रस्तांवर अन्याय होऊ देऊ नका ; प्रकल्पग्रस्तांची मागणी. - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२१ ऑक्टोबर २०२१

प्रकल्पग्रस्तांवर अन्याय होऊ देऊ नका ; प्रकल्पग्रस्तांची मागणी.

शिरीष उगे भद्रावती (प्रतिनिधी)
        :- खुल्या कोळसा खाणी करता संपादित केलेल्या बरांज मोकासा येथील घराचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे या घरांचे सर्वेक्षण ग्रामपंचायत  रेकॉर्ड नुसार करण्यात यावे यात कोणत्याही प्रकल्पग्रस्तांवर अन्याय होऊ नये यासाठी बरांज येथील प्रकल्पग्रस्तांनी तहसिलदारांना निवेदन दिले.

बरांज मोकासा येथील ग्रामपंचायत रेकॉर्ड नुसार येथील प्रकल्पग्रस्तांची जवळपास 1500 घरे आहेत कर्नाटक एम्टा कंपनी 2006 मध्ये चालू झाली आता या कंपनीला पंधरा वर्षाचा काळ लोटत आहे या कालावधीत काहींना घरांचा मोबदला मिळाला ,काही चे घरे पाडली गेली पण मोबदला मिळाला नाही, कंपनीच्या कामकाजामुळे कित्येक घरांची पडझड झाली, यामुळे प्रकल्पग्रस्त इतरत्र वास्तव्यात आहे कंपनीने कोणतीही सूचना न देता बरांज गावात उभे असलेले घरांचे सर्वे चालू केला आहे कंपनीच्या कामामुळे जमीनदोस्त झालेल्या घराकडे दुर्लक्ष केले जात आहे ग्रामपंचायत रेकॉर्ड नुसार समाविष्ट करण्यात आलेल्या प्रत्येक घरांचा मोबदला देण्यात यावा यासाठी बरांज गावातील प्रकल्पग्रस्तांनी तहसीलदार डॉक्टर नितेष खटके यांना निवेदन दिले यावेळी विठ्ठल पुनवटकर, कपूरदास दुपारे , कवीश्वर पुनवटकर, अक्षय कांबळे ,अमित लांडगे, निलेश चालखुरे , सुरेश कातकर, अजय लिहितकर , कुंदन पाटील आदी उपस्थित होते .