बाळासाहेब सोहळे यांची युवासेना पैठण तालुका सचिव पदीं निवड झाल्याबद्दल मंत्री भुमरे यांनी केला सत्कार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत२५ ऑक्टोबर २०२१

बाळासाहेब सोहळे यांची युवासेना पैठण तालुका सचिव पदीं निवड झाल्याबद्दल मंत्री भुमरे यांनी केला सत्कारविहामांडवा प्रतिनिधी

पैठण तालुक्यातील खंडाळा येथील बाळासाहेब सोहळे यांची युवा सेना उपतालुका सचिव पदी निवड करण्यात आली.त्यांना माजी जिल्हा परिषद सभापती विलास बापु भुमरे व युवा सेना औरंगाबाद जिल्हाप्रमुख किशोर चौधरी यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.
दि.२४ ऑक्टोबर रविवार रोजी रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते बाळासाहेब सोहळे यांचा सत्कार करण्यात आले.  

यावेळी युवासेना जिल्हा प्रमुख किशोर चौधरी, रेणुकादेवी शरद सहकारी साखर कारखान्याचे संचालक मुकेश सेठ काला,लहु डुकरे,माजी उपसरपंच बाळासाहेब पन्हाळकर,माजी उपसरपंच सुनिल डुकरे, पांडुरंग पवार,बप्पा येळे, नितिन तांबे,अतुल पन्हाळकर,येवले मामा आदि उपस्थित होते.