Top News

डिजिटल मीडियाचा श्रमिक पत्रकार वर्गवारीत समावेश | digital media

*‘ व्हॉईस ऑफ मीडिया’च्या लढ्याला मोठे यश* *ईलेक्ट्रॉनिक्स, डिजिटल, रेडिओ आस्थापनांचा श्रमिक पत्रकार वर्गवारीत समावेश* *मुंब...

ads

सोमवार, ऑक्टोबर १८, २०२१

पाच वार्षिक अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; वरोरा तालुक्यातील घटना

शिरीष उगे (वरोरा प्रतिनिधी)

:- वरोरा तालुक्यातील शेगाव येथून जवळच असलेल्या अर्जुनी येथे काल रात्रौ ला येथील एका पाच वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली ..

सविस्तर वृत्त असे की नवरात्री महोत्सव निमित्याने शारदा देवी जवळ महाप्रसाद चा कार्यक्रम आयोजित केला होता तर हा कार्यक्रम रात्री 9 वाजेपर्यंत सुरू होता तर जेवण करून घरी जात असता अल्पवयीन मुलगी एकटी पाहून मोहल्यात राहणारा नराधम आरोपी गणेश नामदेव गजभे वय 27 याने पाच वर्षीय मुलीचा हात धरून रस्तालगत असलेल्या गुराच्या गोठ्यात नेले व तिच्याशी अश्लील चाळे करून अत्याचार करीत असल्याचे भयानक दृश्य एका महिलेने पाहिले . सदर ही महिला कसलीही पर्वा न करता सर्व प्रकार तिच्या आई ला सांगितलं तेव्हा प्रकरणाचे गांभीर्य लक्ष्यात घेऊन पीडित अल्पवयीन मुलीसह पोलीस स्टेशन गाठले व सर्व प्रकार येथील पोलीस स्टेशन चे ठाणेदार श्री अविनाश मेश्राम यांनी आरोपी गणेश नामदेव गजभे वय 27 वर्ष याला अटक करून कलम 376 ab 376 (२) ( j ) भांदवी सहकलम ६ पासको नुसार ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे सदर प्रकरणाचा अधिक तपास शेगाव पोलिस स्टेशनचे ठाणेदार अविनाश मेश्राम यांच्या मार्गदर्शनात psi प्रवीण जाधव करीत आहे.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.