पिस्तूलाचा धाक दाखवून बँक लुटणाऱ्या दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

शनिवार, ऑक्टोबर ३०, २०२१

पिस्तूलाचा धाक दाखवून बँक लुटणाऱ्या दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या


   विषेश प्रतिनिधी / इम्तियाज शेख 

 जालना- जिल्ह्यातील शहागड या ठिकाणी बुलढाणा अर्बन बँकेच्या शाखेवर फिल्मी स्टाईल दरोडा टाकणाऱ्या दरोडेखोरांच्या मुसक्या आवळण्यात बीड पोलिसांना यश आले आहे. पिस्तूलचा धाक दाखवून ३ दरोडेखोरांनी २५ लाखांची रोख रक्कम आणि तारण केलेल्या ग्राहकांचे जवळपास ७० लाख रुपयांचे सोने पळवले होते. दिवसाढवळ्या पडलेल्या दरोड्यामुळे मोठी खळबळ उडाली होती.

या प्रकरणाचा अवघ्या २४ तासात छडा लावण्यात गेवराई पोलीस आणि जालना स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. २ दरोडेखोराच्या मुद्देमालासह मुसक्या आवळल्या आहेत. तर अन्य एक जणाचा शोध पोलिस घेत आहेत. अद्याप आरोपीची नावे पोलिसांनी उघड केली नाहीत. जालना जिल्ह्यातील शहागड या ठिकाण झालेल्या बुलढाणा अर्बन बँकेत गुरुवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास ३ दरोडेखोरांनी फिल्मी स्टाईल दरोडा टाकला होता. हा प्रकार घडला तेव्हा बँकेत २ क्लर्क, २ कॅशिअर, २ शिपाई, १ मॅनेजर हजर होते. बंदुकीचा धाक दाखवून ३ जण बँकेत आले. नंतर बँकेत सर्वांना बंदुकिचा धाक दाखवून एका जागेवर बसवले.

दरोडेखोर कॅशिअर प्रमोद पुंडे यांना लॉकरकडे घेऊन गेले, आणि रोख रक्कम २५ लाख रूपये आणि सोने ३ लॉकरमधून अंदाजे ७० लाखांचे सोने घेऊन बँकेच्या बाहेर त्यांची उभा केलेल्या विनाक्रमांकाच्या दूचाकीवरुन पसार झाले होते. गेवराई पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप काळे यांना गुप्तहेरामार्फत माहिती मिळाली की, गेवराई येथील एका जणाने त्याच्या बीडच्या राहत्या घरी गोणीमध्ये पैसे आणि सोने लपवून ठेवले आहे. यानंतर संदीप काळे यांनी शहानिशा करुन उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड तसेच जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने पकडण्यात यश आले असून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.