गोंदिया येथे उमेद व माविम यांची संयुक्त आढावा बैठक संपन्न. - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

मंगळवार, ऑक्टोबर २६, २०२१

गोंदिया येथे उमेद व माविम यांची संयुक्त आढावा बैठक संपन्न.
संजीव बडोले
जिल्हा प्रतिनिधी गोंदिया.

 

नवेगावबांध दि.26 ऑक्टोबर:-

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष कार्यालय गोंदिया येथे उमेद व माविम यांची संयुक्त आढावा बैठक मुख्यकार्यकारी जिल्हा परीषद गोंदिया चे अनिल पाटील, प्रकल्प संचालक हरीनखेडे यांचा उपस्थितीत घेण्यात आली.सदर बैठकीत नरेंद्र रहांगडाले, जिल्हा अभियान व्यवस्थापक,संजय संगेकर जिल्हा कार्यक्रमअधिकारी गोंदिया व 8 तालुक्यांचे तालुका अभियान व्यवस्थापक, तालुका व्यवस्थापक सर्व Thematic उपस्थित होते.

आढावा बैठकीत 3 NRETP तालुका मोरगांव अर्जुनी ,सालेकसा, तिरोडा व NRLM तालुके आमगाव, देवरी, गोंदिया, गोरेगाव व सडक अर्जुनी या तालुक्यांचा आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये लक्ष्यनिहाय झालेल्या कामाचा विस्तृत आढावा घेण्यात आला. तसेच वितरीत केलेल्या निधीचे उपयोग कुठे व कसा होत आहे यावर आढावा घेण्यात आले.स्वयं सहायता समुहा मार्फत सुरु असलेल्या उपक्रमाचा सुद्धा आढावा घेण्यात आला. प्रकल्प संचालकांनी ज्या कामाचे लक्ष पुर्ण झालेले नाहीत. ते लकवरात लवकर पुर्ण करण्यास सर्व तालुक्याच्या व्यवस्थापकांना सांगितले.जिल्हा अभियान संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गोंदिया यांनी
उपजीविका, सेंद्रिय शेती, तसेच महिलांनी तयार केलेली वस्तु यांना कशाप्रकारे ब्रंडिंग, पॅकेझिंग करायला पाहिजे, ग्रामीण भागातील जास्तीत जास्त महिलांची आर्थिक स्थिति मजबूत होण्यासाठी स्वयरोजगार करावे व  समुहामार्फत तयार करण्यात आलेल्या उत्पादनांच्या प्रदर्शनीला भेट दिली तसेच उत्पादनांची Value Edition कसे करता येईल त्याबद्दल सर्व उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले अशा सर्व प्रकारचे मार्गदर्शन केले. त्याच प्रमाणे जिल्हा अभियान सहसंचालक तथा प्रकल्प संचालक जि. ग्रा. वि. य. गोंदिया यांनी गटातील महिलांसाठी उद्योजक, गृहउद्योगाबाबत विविध गृहोपयोगी वस्तु या बद्दल माहिती दिली.
 तसेच  मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना  आवाहन केले आहे की, या दिवाळी निमित्त सर्वांनी स्वयं सहायता समुहा द्वारे उत्पादित वस्तूंची खरेदी करावी.