नवेगावबांध येथे शिलाई शिक्षिका प्रशिक्षण संपन्न. - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत२७ ऑक्टोबर २०२१

नवेगावबांध येथे शिलाई शिक्षिका प्रशिक्षण संपन्न.

स्वतःच्या पायावर उभे राहून महिलांनी  आर्थिक विकास साधावा.
-राजेंद्र बडोले.

संजीव बडोले प्रतिनिधी.

नवेगावबांध दि.26 ऑक्टोबर:-

 शिलाई शिक्षिका प्रशिक्षणातून गेल्या आठ दिवसापासून कौशल्य संपादन आपण केले आहात. आदिवासी समाजातील महिलांनी आत्मनिर्भर व्हावे,यासाठी हे प्रशिक्षण आपणास देण्यात आले. आदिवासी समाज हा वनातून मिळणाऱ्या उपजावर आपली जिविका भागवत होता.आज आपण शेती करतो, त्याला एक पूरक व्यवसाय म्हणून, प्रशिक्षणार्थ्यांनी या याकडे पहावे. स्वतःच्या पायावर उभे राहून महिलांनी स्वतःचा आर्थिक विकास साधावा. असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते तथा संस्थेचे मार्गदर्शक राजेंद्र बडोले यांनी यावेळी केले.
 ते उषा इंटरनॅशनल लिमिटेड कंपनी दिल्ली व अफार्म पूणे आणि ग्राम विकास संस्था भंडाराच्या वतीने शिलाई शिक्षीका प्रशिक्षणाचे आयोजन रुख्मा महिला महाविघालय नवेगावबांध येथे आयोजीत करण्यात आले होते.समारोपीय कार्यक्रमा प्रंसगी आज बोलत होते. सदर कार्यक्रमाला सामजिक कार्यकर्ते तथा संस्थेचे मार्गदर्शक राजेंद्र बडोले,रुखमा महिला  महाविद्यालयाचे संस्थापिका वैशालीताई बोरकर,संजीव बडोले,संस्थापक एकनाथ बोरकर तसेच उषा शिलाई इंटरनॅशनल लि.पुणेच्या  ट्रेनर सुनयना रणदिवे मुंबई, ट्रेनर वर्षा मते हे उपस्थितीत होते. शिलाई शिक्षिका प्रशिक्षणातून महिलांना स्वयं रोजगाराची संधी मिळत असुन,तांत्रिक ज्ञाना बरोबरच शिलाई शिक्षिकेचे प्रशिक्षण आपणास दिले गेले. आपण स्वतः बरोबरच इतर युवती व महिलांनी प्रशिक्षण देऊन, त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी हातभार लावावा, सामाजिक ऋण देखील फेडण्याची ही उत्तम संधी आहे. असे प्रतिपादन राजेंद्र बडोले यांनी आपल्या भाषणातून पुढे केले.
उषा कंपणी कडुन सिलाई मशिन ' मशीन दुरुस्तीचे काम,तांत्रिक दुरुस्ती,नवनवीन डिझाईनचे ब्लाउज तयार करणे हे प्रशिक्षण दिले गेले.
 शामकला औरासे,शीतल मडावी,रिना औरासे या महिला प्रशिक्षणार्थ्यांनी आपले मनोगत यावेळी व्यक्त केले. 
प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांना अतिथींच्या हस्ते शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले.
या प्रशिक्षणात परिसरातील 20 आदिवासी महिलांना प्रशिक्षण दिल्या गेले.कार्यक्रमाचे संचालन ग्रामविकास संस्था भंडाराचे संचालक दिलीप  बिसेन तर आभार किशोर रंगारी समन्वयक यांनी मानले .कार्यकम यशस्वीतेसाठी सर्व २० प्रशिक्षणार्थी तसेच रुखमा महीला महाविद्यालय नवेगावबांधचे कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले .