कोरोना लसीचे दोन डोस घेतले असतील तरच मिळणार पगार - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

रविवार, ऑक्टोबर २४, २०२१

कोरोना लसीचे दोन डोस घेतले असतील तरच मिळणार पगार


औरंगाबाद- जिल्हा परिषद शिक्षकांसाठी वरिष्ठ कार्यालयाकडून नवा नियम लागू करण्यात आला आहे . ज्या शिक्षकांनी कोरोना लसीचे दोन डोस घेतले असतील त्यांनाच पगार मिळणार आहे . त्यामुळे ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले नाहीत त्यांना पगार मिळणे कठीण जाणार आहे . दरम्यान , जिल्ह्यातील शिक्षकांना पगार बिलासोबत कोरोना प्रतिबंधक लसीच्या दोन डोसचे प्रमाणपत्र देण्यासंदर्भात वरिष्ठ कार्यालयाकडून आदेश देण्यात आले आहेत .