सेवानिवृत्त शिक्षक अशोक टेंभुर्णे यांचा सत्कार व निरोप. - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत३१ ऑक्टोबर २०२१

सेवानिवृत्त शिक्षक अशोक टेंभुर्णे यांचा सत्कार व निरोप.


संजीव बडोले
जिल्हा प्रतिनिधी गोंदिया.

नवेगावबांध दि.३१ ऑक्टोबर:-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय नवेगावबांध येथील ज्येष्ठ शिक्षक अशोककुमार पुंडलिक टेंभुर्णे हे नियत वयोमानपरत्वे आज निवृत्त झालेले आहेत. याप्रसंगी विद्यालयाच्या वतीने त्यांचा सपत्नीक सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. 
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रज्ञा शिक्षण संस्था येरंडी नवेगावबांधचे संस्थापक सचिव दलितमित्र सुखदेवराव दहिवले  हे उपस्थित होते .प्रमुख अतिथी म्हणून संस्थेच्या अध्यक्षा मालिनीताई दहिवले  सहसचिव अनिलकुमार दहिवले  संस्था सदस्या नूतनताई दहिवले,सत्कारमूर्ती अशोककुमार पुंडलिक टेंभुर्णे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय चिचाळबारव्हाचे मुख्याध्यापक  यु.एच. तासलवार, व्ही. एल. जनबंधू ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय नवेगावबांधचे  मुख्याध्यापक किशोर शंभरकर, निरुपाताई अशोककुमार टेंभुर्णे, अनुज दहिवले, अनुज टेंभुर्णे आदी मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी टेंभुर्णे दांपत्याचा शाल, श्रीफळ, कपडे, साडी- चोळी आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी सर्व मान्यवरांनी अशोक टेंभुर्णे यांच्या 31 वर्षाच्या सेवेचा आढावा घेतला. त्यांच्या कार्याचा गौरव केला .सर्वांनी त्यांना भावी आयुष्याच्या भरभरून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे संचालन नरेश कोरे यांनी केले.तर उपस्थितांचे आभार  रवींद्रकुमार दहिवले यांनी मानले .कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विद्यालयातील समस्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवृंद आणि विद्यार्थी यांनी  अथक परिश्रम घेतले .