महाराष्ट्र बंद - तोडफोड , मारहाण अन् ..... - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


११ ऑक्टोबर २०२१

महाराष्ट्र बंद - तोडफोड , मारहाण अन् .....


महाराष्ट्र- बंद दरम्यान आज काही ठिकाणी तोडफोड आणि मारहाण झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत . बेस्टच्या 8 बसेसची तोडफोड करण्यात आली आहे . तर ठाण्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी रिक्षावाल्यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे . दुसरीकडे चंद्रपुरात शिवसैनिकांकडून शिवभोजन केंद्राची तोडफोड झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे . तर काही ठिकाणी दुकाने बंद करण्यास बळजबरी करण्यात आल्याचे वृत्त आहे .