यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षणोत्सव साजरा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०४ ऑक्टोबर २०२१

यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षणोत्सव साजरा


शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी)

          :-आज दिनांक 4 ऑक्टोबर 2021 रोज सोमवारला शासनाच्या आदेशान्वये व निर्देशानुसार covid-19 नियमांचे पालन करून यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय सुरू करण्यात आले आहे.
              आज सकाळी साडेसात वाजता प्राचार्य डॉ जयंत वानखेडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांचे  स्वागत करण्यात आले . विद्यार्थ्यांचे तापमान व तपासण्यात आले,
शालेय परिसरात वावरताना विद्यार्थ्यांनी कोविड नियमांचे पालन करणे सक्तीचे असल्याचे प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना संगीतले. अनेक दिवसांपासून प्रत्यक्ष विद्यार्थ्यांचे शाळेत येणे शाळा बंद होते. बर्‍याच दिवसानंतर विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळेत यायला मिळाले असल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साह संचारला होता. यावेळी मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. 
अनेक दिवसांनी शालेय परिसर विद्यार्थ्यांनी गजबजल्याने शालेय परिसरात नवसंजीवनी आल्यासारखे वाटत होते. शाळेमार्फत विद्यार्थ्यांना मोफत मास्क चे वितरण करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. वानखेडे सर, डॉ.मोते सर, डॉ.हटवार सर,प्राध्यापक  रमेश चव्हाण सर व सर्व प्राध्यापक ,  शिक्षक उपस्थित होते.