जळगाव- मोठा राजकीय भूकंप ; शिवसेनेला धक्का , भाजप पुन्हा बहुमतात - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


१३ ऑक्टोबर २०२१

जळगाव- मोठा राजकीय भूकंप ; शिवसेनेला धक्का , भाजप पुन्हा बहुमतात


जळगाव- महापालिकेत मोठा राजकीय भूकंप झाला आहे . शिवसेनेसोबत गेलेल्या 27 फुटीर नगरसेवकांपैकी 13 जणांनी पुन्हा भाजपची वाट धरली आहे . त्यामुळं जळगाव महापालिकेतील सत्तासमीकरणं बदलली असून भाजप पुन्हा बहुमतात आला आहे . या घडामोडींमुळं शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसला आहे . दरम्यान , मार्च महिन्यात झालेल्या महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भाजपचे 27 नगरसेवक फुटले होते .