मोदी सरकारने घेतले मोठे निर्णय - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


१३ ऑक्टोबर २०२१

मोदी सरकारने घेतले मोठे निर्णय

 
नवि दिल्ली - केंद्रीय कॅबिनेटने फर्टिलायजरवर सब्सिडी देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे . सैनिक स्कूल सोसायटी अंतर्गत 100 खासगी सरकारी सैनिक शाळांना मान्यता देण्यासोबतच अटल ' नुतनीकरण व शहरी परिवर्तन मिशन 2.0 ' लाही मंजुरी देण्यात आली आहे . फर्टिलायजरसाठी 28,655 कोटींची अतिरिक्त सब्सिडी मंजूर करण्यात आली आहे . याआधीच्या कॅबिनेट बैठकीत रेल्वेच्या कर्मचाऱ्यांसाठी 78 दिवसांचा बोनस जाहीर करण्यात आला होता .