स्वयंभुत शिक्षण प्रशिक्षणाच्या संधीचं सोनं करा - मनीषा तरोणे. - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

शुक्रवार, ऑक्टोबर २९, २०२१

स्वयंभुत शिक्षण प्रशिक्षणाच्या संधीचं सोनं करा - मनीषा तरोणे.

प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्र व शीलाई मशिनचे वाटप.

संजीव बडोले प्रतिनिधी.

नवेगावबांध दि.29 ऑक्टोबर:-
 उषा इंटरनॅशनल लिमिटेड दिल्ली, अफार्म पूणे आणि ग्रामविकास संस्था भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने रुखमा महिला महाविद्यालय नवेगावबांध येथे 9 दिवसाचे शिलाई मशिन शिक्षीकांचे प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिणार्थ्यांना शिक्षीका प्रमाणपत्र वाटप, शिलाई मशिन वाटप कार्यक्रमा प्रसंगी नवेगाव बांध परीसरातील २० आदिवासी समाजातील महिलांना प्रशिक्षण व्दारे त्यांना सक्षम बनवून कुंटुबाचा आधार म्हणून त्यांचा जास्तीत जास्त उदरनिर्वाहासाठी कसा फायदा होईल आणि इतर महिलांना सुद्धा सक्षम कसं बनता येईल. याचा जास्तीत जास्त हातभार लागावा . जिद्द आणि चिकाटीतून स्वयंभुत शिक्षण प्रशिक्षणाच्या माध्यमातून मिळालेल्या संधीचं सोनं करा. आवाहन कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी,  सामाजीक कार्यकर्त्या मनिषा किशोर तरोणे यांनी केले . या कार्यक्रमा दरम्यान माजी जी,प,सदस्य किशोर तरोणे, रुखमा महिला महाविघालयाच्या संचालिका वैशाली ताई बोरकर .  मास्टर ट्रेनर वर्षा मते लाखनी हे होते. कार्यकमाची रुपरेषा व प्रशिक्षणाचे मुख्य हेतू ग्राम विकास संस्था भंडाराचे संस्थापक दिलीप बिसेन यांनी सांगीतले .विडीओ ग्राफींग च्या माध्यमातून महिला स्वयंरोजगाराच्या माध्यमातून स्वयंभु कशी होईल व कुंटुबाचा आधारवड कशी बनेल, परसबाग च्या माध्यमातून भाजीपाला तयार करणे . उषा लिमीटेड च्या माध्यमातून व्यवसाय कसा करावा. याविषयीची सवीस्तर माहीती सांगीतली . तर आभार संस्थेचे समन्वयक किशोर रंगारी यांनी मानले. या प्रशिक्षण दरम्यान आपले मनोगत इंदु कुंभरे, शितल मडावी यांनी व्यक्त केले. तसेच कार्यक्रमासाठी २० प्रशिक्षणार्थी उपस्थितीत राहुन सहकार्य केले. तसेच रुखमा महिला महाविघालय नवेगावबांधचे कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण पूर्णत्वास नेण्यास मदत करुण सहकार्य केले.