सिल्लोड कन्नड रस्त्यावर भिषण अपघात; दोन जण जागीच ठार - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

शुक्रवार, ऑक्टोबर २२, २०२१

सिल्लोड कन्नड रस्त्यावर भिषण अपघात; दोन जण जागीच ठार
सिल्लोड तालुक्यात रस्त्यावर उभ्या असलेल्या नादुरुस्त टिप्परला आयशरने पाठीमागून धडक दिल्याची घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली . या घटनेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर चार जण जखमी  झाले  .

हा भीषण अपघात सिल्लोड - कन्नड रस्त्यावरील धानोरा फाट्याजवळ   पहाटेच्या सुमारास झाला . अपघातात मरण पावलेले दोघेही सोलापूर जिल्ह्यातील   रहिवासी आहेत . पाचोरा येथून काही ऊसतोड कामगारांना घेऊन हा आयशर बारामतीकडे निघाला होता . धानोरा फाट्याजवळ रस्त्यावर त्याने नादुरुस्त टिप्परला मागून धडक दिली . या भीषण अपघातामध्ये कल्पनाबाई इमाजी पवार , प्रशांत विठ्ठल वाघ , हे दोघे जागीच ठार झाले . तर अन्य चार जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे . अपघात एवढा भीषण होता की आजूबाजूचे लोक मोठ्या प्रमाणावर घटनास्थळी जमा झाले . दरम्यान जखमींना सिल्लोडच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे . या घटनेची ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे .