पुरोगामी पत्रकार संघ भद्रावती तर्फे डॉ. ज्ञानेश हटवार यांचा सत्कार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२१ ऑक्टोबर २०२१

पुरोगामी पत्रकार संघ भद्रावती तर्फे डॉ. ज्ञानेश हटवार यांचा सत्कार


शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी)
             :- पुरोगामी पत्रकार संघ भद्रावती शाखेचे सहसचिव डॉ. ज्ञानेश हटवार सर यांना गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे नुकत्याच झालेल्या नवव्या दिक्षांत समारंभात आचार्य (पीएचडी) पदवी देऊन सम्मानित करण्यात आले.
विद्यापिठाचे कुलगूरू डॉ. श्रीनिवास वरखेडी यांचे हस्ते प्राध्यापक ज्ञानेश हटवार यांना आचार्य पदवी प्रदान करण्यात आली होती. 

       पुरोगामी पत्रकार संघ भद्रावतीचे अध्यक्ष प्रविण चिमुरकर, उपाध्यक्ष शिरीष उगे, मनोज मोड़क कार्याध्यक्ष, सचिव उमेश कांबळे, सदस्य रत्नाकर ठोंबरे, सदस्य आशीष कोटकर यांच्या उपस्थितीत  भद्रावती पुरोगामी पत्रकार संघाचे सहसचिव प्राध्यापक डॉ . ज्ञानेश हटवार यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आणि पुरोगामी पत्रकार संघ भद्रावती यांचे कडुन अभिनंदन करण्यात आले.