निळकंठराव शिंदे महाविद्यालयाची सौम्या सिंह सुवर्ण पदकाने सन्मानित ; राज्यपालांच्या हस्ते सुवर्ण पदक वितरित - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


१३ ऑक्टोबर २०२१

निळकंठराव शिंदे महाविद्यालयाची सौम्या सिंह सुवर्ण पदकाने सन्मानित ; राज्यपालांच्या हस्ते सुवर्ण पदक वितरित


शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी)
             :- स्थानिक निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयातील विद्यार्थिनी कुमारी सौम्या सिंह हिने गोंडवाना विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्र विज्ञान शाखेचे अंतर्गत बी. एस्सी मधून प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल स्वर्गीय निळकंठराव शिंदे स्मृती सुवर्णपदक महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल तथा गोंडवाना विद्यापीठाचे कुलपती भगतसिंग कोसारी यांच्या हस्ते प्रदान करून विद्यापीठाच्या नव्या दिक्षत समारंभात गौरविण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष हर्षद चव्हाण गडचिरोली, जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. श्रीनिवास वरखडे, प्र. कुलगुरू डॉ. श्रीराम कावडे, कुलसचिव डॉ. अनिल चिताळे, व्यवस्थापन परिषद विधी सभा व विद्या परिषदेचे सदस्य इत्यादी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित सुवर्णपदक देऊन सन्मानित करण्यात आले. त्याबद्दल डॉ. विवेक शिंदे, प्रा. डॉक्टर लेमराज लडके, प्राचार्य डॉ. विशाल शिंदे व प्रा. डॉक्टर कार्तिक शिंदे यांनी अभिनंदन केले.