वरोऱ्याच्या तिन अल्पवयीन अपहृत मुलींची पुणे येथून सुटका ; चार आरोपींना अटक - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत०१ ऑक्टोबर २०२१

वरोऱ्याच्या तिन अल्पवयीन अपहृत मुलींची पुणे येथून सुटका ; चार आरोपींना अटकशिरीष उगे (वरोरा प्रतिनिधी)

:- वरोरा तालुक्यातील तिन अल्पवयीन अपहृत मुलींची पुणे येथून केली सुटका केली असुन चार आरोपींना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे.
सविस्तर वृत्त असे की, दि.२७/०९/२०२१ रोजी वरोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन अल्पवयीन मुली त्यांचा मैत्रीणचा वाढदिवस असल्याचे सांगून सकाळच्या वेळीच ह्या मुली घरून निघुन गेल्या होत्या. मुली सायंकाळ पर्यंत घरी परत न आल्याने मुलींच्या आई वडीलांनी व ईतर नातेवाईकांनी मुलींचा सर्वत्र शोध घेतला मात्र कोणत्याही मैत्रिणी, तसेच परिचित लोकांना त्यांच्याबद्दल कुठलीही माहिती नसल्याने मुलींचा शोध लागु शकला नाही त्यामुळे अखेर मुलींच्या नातेवाईकांनी पो.स्टे. वरोरा येथे दिनांक 28 सप्टेंबर रोजी मुलींना कोणीतरी अज्ञात इसमांनी फुस दिली.
वरोरा पोलिसांनी अप.क. ७२७/ २०२१, ७२८/२०२१ कलम ३६३ भा.द.वी. अन्वये अज्ञात आरोपीता विरुद्ध मुलींना फुस लावून पळवून नेल्या बाबत गुन्हा दाखल करून तपासकार्य सुरू केले. सदर दोन्ही मुलींचे वय १५ वर्षांचे आतील असल्याने प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना तात्काळ सदर गुन्हयाचा छडा लावण्या करीता सुचना दिल्या.
वरिष्ठांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक खाडे ह्यांनी तात्काळ स.पो.नि जितेंद्र बोबडे, पो.उपनि. संदीप कापडे, सचिन गदादे, अतूल कावळे यांचे नेतृत्वात चार पथक तयार करून शोध मोहिम सुरू केली. पथकाने घटनास्थळावर जावून गुन्हयाची सखोल माहिती गोळा केली. मिळालेल्या माहितीवरून सदर मुलींच्या संपर्कात यवतमाळ जिल्हयातील राळेगांव येथील काही मुले असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यावरून स्था.गु.शा.चंद्रपरची तिन पथके तात्काळ राळेगांव येथे तपास कामी रवाना झाले. त्या ठिकाणी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पो.स्टे.बाबुळगांव जि.यवतमाळ हद्दीतील एका मुलगी अज्ञात इसमाव्दारे अपहरण केल्या बाबत दि. २७/०९/२०२१ रोजी अप.क्र. ४१७/२०२१ कलम ३६३ भा.द.वी. अन्वये नोंद असल्याचे समजले.

पो.स्टे.वरोरा हद्दीतील व पो.स्टे.बाबुळगांव जि.यवतमाळ हद्दीतील मुलींचे एकाच वेळी घडलेल्या अपहरण झाल्याने पोलिसांचा संशय बळावला. त्यामुळे दोन्ही ठिकाणच्या घटनेमागे एखादी टोळी असल्याचा संशय आल्याने त्यादृष्टीने तपासाची चक्रे फिरविण्यात आलो.
पथकातील अधिकाऱ्यांनी अधिकची माहिती घेतली असता दि.२९/०९/२०२१ रोजी रेल्वे स्टेशन वर्धा जंक्शन येथे दिसून आल्या बाबत माहिती प्राप्त झाली. त्या बाबत अधिक माहिती घेतली असता, वरील नमुद गुन्हयातील पिडीत मुली व त्यांना घेवून जाणारे मुले हे रांजनगांव जि.पुणे येथे असल्याचे माहिती प्राप्त झाली. त्यावरून तात्काळ मा.पोलीस अधीक्षक सा. व पो नि, सा, स्था गु.शा, चंद्रपूर यांना माहिती देवून त्यांचे मार्गदर्शनाखाली पुणे करीता पथक रवाना झाले, तात्काळ पुणे पोलीसांना सुद्धा वरीष्ठ अधिकारी यांचे मार्फतीने माहिती देवून त्यांचे मदतीने सापळा रचून शिताफीने कार्यवाही केली असता. नमुद गुन्हयातील तिन अपहरण झालेल्या अल्पवयीन मुली व त्यांचे सोबत ४ संशयीत मुले नामे १) रोहीत गोपाल संगीले वय २० वर्षे २) शुभम संजय मानेकर वय २२ वर्षे ३) प्रमोद मोतीबाबा सोनवने वय २२ वर्षे ४) प्रक्षिक विलास भोयर वय २३ वर्षे सर्व रा.राळेगांव जि.यवतमाळ हे सापडून आल्याने सर्वांना ताब्यात घेवून चंद्रपूर येथे आणण्यात आले असून पुढील कार्यवाही सुरू आहे.
सदरची यशस्वी कामगीरी मा. श्री.अरविंद साळवे पोलीस अधीक्षक चंद्रपुर , अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अतुल कालकर्णी यांचे मार्गदर्शनात पो.नि. बाळासाहेब खाडे स्थानिक गुन्हे शाखा, स्थानिक गुन्हे शाखा पथकाचे स.पो.नि जितेंद्र बोबडे, पो.उपनि. संदीप कापडे, सचिन गदादे, अतूल कावळे, पो.स्टॉफ पो.हवा.धनराज करकाडे, स्वामीदास चालेकर, ना.पो. शिगजानन नागरे, पो.शि.प्रशांत नागोसे, संदीप मुळे, चा.ना.पो शि दिनेश अराडे यांनी केली.